एक्स्प्लोर

मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र थांबेना; मराठवाड्यात दोघांनी संपवलं जीवन

Maratha Reservation : गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा मराठवाड्यात दोघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांत मराठवाड्यात (Marathwada) होणाऱ्या आत्महत्यांचे (Suicide) सत्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आत्महत्या करू नका असे अवाहन मनोज जरांगे यांच्याकडून सतत करण्यात येत आहे. मात्र, असे असतांना देखील आत्महत्या सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा मराठवाड्यात दोघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यातील 34 वर्षीय आणि लातूरमधील (Latur) 21 वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवलं आहे. सचिन शिंदे (वय 34 वर्ष, सनपुरी लातूर), प्रदीप निवृत्ती मते (वय 21 वर्ष, रा.लोणी शहाजहानपूर, ता. जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणांची नावं आहेत. 

मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच कुठल्याही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलून नाही, असं प्रशासन, मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही तरुण आत्महत्याकडे वळत आहेत. परभणीच्या सनपुरी गावात 34 वर्षीय सचिन शिंदे याने मराठा आरक्षणासाठी आपले जीवन संपवले आहे. 'मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मी स्वतःला संपवत आहे', अशा आशयाची चिठ्ठी लिहून सचिनने शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात असून, संपूर्ण सनपुरी गावावर शोककळा पसरली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लातूर जिल्ह्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसचे शिक्षण घेत असलेल्या प्रदीप मते या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. 'मराठा आरक्षण' अशी चिठ्ठी लिहून व मोबाईलवर स्टेटस ठेवत गळफास लावून या तरुणाने जीवन संपवलं. शुक्रवारी (12 डिसेंबर) रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका खाजगी वसतिगृहात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाईलच्या स्टेटसला 'मराठा आरक्षण' 

प्रदीप मते एका खाजगी आयुवेर्दिक महाविद्यालयात बीएएमएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. तो सध्या खाजगी वसतिगृहात राहत होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी त्याची सुरुवातीपासूनच धारणा होती. मराठा आरक्षणासाठी त्याने शुक्रवारी राहत असलेल्या खोलीतील पंख्याला सुताच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी मयत प्रदीप मते याने एका चिठ्ठीत 'मराठा आरक्षण-12-1- 2024' व मोबाईलच्या स्टेटसला 'मराठा आरक्षण' असे लिहून आपली जीवनयात्रा संपविली. याप्रकरणी लातूरच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Yavatmal News : पाठपुरावा करून देखील न्याय न मिळाल्याच्या रोषातून संतप्त शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल; तहसीलदारांच्याचं कक्षात केला जीवन संपवण्याचा प्रयत्न

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget