एक्स्प्लोर

राष्ट्रपती निवडणुकीत नगरमधील 2 आमदार फुटले : सत्यजीत तांबे

राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षातील आमदारांची मतं फुटल्याची चर्चा असतानाच, आता युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर संशय व्यक्त केला आहे.

मुंबई: राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षातील आमदारांची मतं फुटल्याची चर्चा असतानाच, आता युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे दोन आमदार फुटल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. "मला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील 2 विरोधी पक्षाच्या आमदारांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान केलं आहे. धक्कादायक!", असं ट्विट सत्यजीत तांबे यांनी केलं. https://twitter.com/satyajeettambe/status/888103508930686976 https://twitter.com/satyajeettambe/status/888020880873451520 https://twitter.com/satyajeettambe/status/887149939163254784 विरोधकांच्या मतांचं गणित दुसरीकडे विरोधकांची मतं फुटल्यानं ते धास्तीत आहेत. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिळून 6 मतं फुटलीत, तर इतर 8 विरोधकांनीही भाजपला मतदान केलं आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये नेमकी कुणाची मतं फुटली, याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मीरा कुमार यांना महाराष्ट्रातून एकूण 77 मतं पडली. मात्र, महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदार संख्येवर नजर टाकल्यास, या दोन्ही पक्षांचे एकूण 83 आमदार आहेत. म्हणजे ही सगळी मतं मीरा कुमार यांना पडणं अपेक्षित होतं. दुसरीकडे एमआयएम, भारिप-बहुजन महासंघ, माकप, सपा या पक्षांची एकूण 5 मतं ही मीरा कुमार यांच्याकडे झुकली असण्याची शक्यता अधिक आहे. आता या पाच पक्षांची मतं मीरा कुमार यांना मिळाली असतील, तर मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एकूण 11 मतं फुटली असा त्याचा अर्थ निघतो. दरम्यान, राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेले आमदार रमेश कदम यांनी मतदानाच्या दिवशीच जाहीर केलं होतं की, ते रामनाथ कोविंद यांना मतदान करतील. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या कोणत्याही आमदाराने रामनाथ कोविंद यांना मत दिलं नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहे. संबंधित बातम्या  आमदार रवी राणांचा दावा खरा ठरला, महाराष्ट्रातील 22 मतं फुटली!  कोविंद यांच्या विजयाने सेनेची हवा गुल, राज्यात भाजपकडे बहुमत? रामनाथ कोविंद देशाचे नवे राष्ट्रपती

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
Embed widget