एक्स्प्लोर

अहमदनगरमधील बनावट दारुकांडातील मृतांचा आकडा 11 वर

अहमदनगर : अहमदनगरला बनावट दारुकांडातील मृत्यूचं तांडव काही थांबताना दिसत नाही. मंगळवारी पुन्हा दोघा अत्यवस्थ रुग्णांचा बळी गेल्यानं खळबळ उडाली आहे. दारुकांडात जिल्ह्यात आतापर्यंत 11 जणांचा बळी गेला आहे. नगरमधील जेऊर गटातील पांगरमल गावात पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर हा प्रकार घडला आहे. पांगरमलच्या भास्कर अव्हाड यांचा खासगी रुग्णालयात मंगळवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अजूनही 10 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. तर कौडगावला नरेन्द्र चकले यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय. गेल्या तीन दिवसापासून चकले अत्यावस्थ होते. कौडगावला तीनच दिवसांपुर्वी बनावट दारुनं बाळासाहेब मदगे यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे गावात शोकाकुल वातावरण आहे. तर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अजूनही तीन ते चार जणांचा बनावट दारुनं मृत्यू झाल्याची चर्चा आहे मात्र पोलीस दप्तरी त्याची नोंद नाही. काय आहे प्रकरण? निवडणूक प्रचाराच्या पार्टीदरम्यान अतिमद्यपानाने आतापर्यंत आठ जणांचा बळी गेला आहे. बनावट दारु प्यायल्याने ही घटना घडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चौकशीचे धागेदोरे थेट अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयापर्यंत पोहचले आहेत. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनच्या आवारात बनावट दारुची विक्री सुरु असल्याचं उघड झालं. कॅन्टीनमधून 12 प्रकारच्या विदेशी दारुच्या बाटल्यांची झाकणं, रिबॉटलिंग साहित्य, इसेन्स कलर असं अनेक साहित्य जप्त करण्यात आलं. शिवाय या कॅन्टीनमधून अनेक आधार कार्ड आणि द्रारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डचा साठाही उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. त्यामुळे यामागे मोठं टोळकं असू शकतं असा संशय पोलिसांना आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केल्यानंतर ही गंभीर बाब समोर आली आहे. रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत तसंच शहराच्या इतर परिसरात ही दारु सर्रास विकली जाते.

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Chandrapur Crime News: चंद्रपूर महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 84 महिलांची फसवणूक; 3 वर्षात कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय, एकाला अटक
चंद्रपूर महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 84 महिलांची फसवणूक; 3 वर्षात कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशय, एकाला अटक
Chhatrapati Sambhajinagar Khavdya Mountain Family News: विवाहाच्या वादातून चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी अंत?; बहिणीचा गंभीर आरोप, आई-वडिलही मनातलं सगळं बोलले!
विवाहाच्या वादातून चांदगुडे कुटुंबाचा दुर्दैवी अंत?; बहिणीचा गंभीर आरोप, आई-वडिलही मनातलं सगळं बोलले!

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Baramati News: इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
इमारतीच्या टेरेसवर कडी लावलेली; एक चप्पल वरती पडलेली; रोहित पवारांच्या पीएच्या मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा, रात्री नेमकं काय घडलं?
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
बीडमधील मोर्चात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, वादग्रस्त टीका; गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा, काळकुटेंची फिर्याद
Embed widget