एक्स्प्लोर
नागपूरच्या लोहरा वनक्षेत्रात दोन भावांवर बिबट्याची झडप
नागपूरच्या लोहारा वनक्षेत्र भागात दोन भावांवर बिबट्याची झडप घातली. मात्र, स्वसंरक्षणासाठी केलेल्या प्रतिकारात कुऱ्हाडीच्या वाराने बिबट्याचा मृत्यू झाला.

नागपूर : नागपूरच्या लोहारा वनक्षेत्र भागात दोन भावांवर बिबट्याची झडप घातली. मात्र, स्वसंरक्षणासाठी केलेल्या प्रतिकारात कुऱ्हाडीच्या वाराने बिबट्याचा मृत्यू झाला. तर दोघेही भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. उमरेड तालुक्यातल्या लोहारा वनक्षेत्राजवळ असलेल्या ठाकरे कुटुंबियांच्या शेतावर आज सकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्यानं रवींद्र आणि राजेंद्र ठाकरे हे दोन भाऊ शेतावर असतानं त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही भावांनी मोठ्या धाडसानं बिबट्याला प्रतिकार केला, आणि हातातल्या लाकडी काठ्या तसंच कुऱ्हाडीनं बिबट्यावर वार केले. त्यामुळे माणूस विरुद्ध बिबट्याच्या या कठीण लढाईत बिबट्याचा मृत्यू झाला. पण दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. या भावांवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























