एक्स्प्लोर

अडीच फुटाचा नवरा, तीन फुटाची नवरी, एका लग्नाची धमाल गोष्ट...!

नवरदेवाने पारण्याआधी सगळ्यांच्या आग्रहावरुन झिंगाट वर ठेका धरत आपल्या लग्नाचा आनंद साजरा केला. तर दुसरीकडे वधू शारदाला महिलांनी हळद लावली. पारणे वाजत गाजत गावात गेले यावेळी वरातीत तरुणाईनेही ठेका धरला.

पंढरपूर : कार्तिक द्वादशीनंतर लग्नाचे मुहुर्त सुरु झाल्याने सध्या गावोगावी लगीनघाई सुरु झाली आहे. मात्र आज सांगोला तालुक्यातील अजनाळे गावात वेगळीच लगबग सुरु होती. अजनाळेत अडीच फूट उंचीचा नवरदेव आणि तीन फूट उंचीच्या नवरीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या गावाला कायम हसवत ठेवणाऱ्या लाडक्या विशालचे आज लग्न होते. एकवीस वर्षाचा विशाल भडंगे. उंचीने अडीच फुटापेक्षाही कमी. मात्र वाघ्यामुरळीच्या पथकात अफलातून कला सादर करणाऱ्या विशालची ओळख अवघ्या पंचक्रोशीला आहे. विशालचे लग्न म्हणल्यावर सगळ्यांना प्रश्न पडला होता वधू नेमकी कोण? पण लग्नाची चिठ्ठी हातात पडल्यावर तो देखील उलगडा झाला. सांगोला तालुक्यातीलच वासुद अकोले येथील शारदा गेजगे हिची गाठ विशालशी बांधली होती. शारदा उंचीने विशालपेक्षा थोडी मोठी म्हणजे 3 फूट उंचीची आणि नववीपर्यंत शिक्षण घेतलेली आहे. अडीच फुटाचा नवरा, तीन फुटाची नवरी, एका लग्नाची धमाल गोष्ट...! लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात अशी म्हण खोटी नाही हे या गोड दांपत्याकडे पाहून नक्कीच पटेल. नवरदेवाच्या घरासमोर मांडव सजला होता. गावातील खंडोबा मंदिराजवळील कार्यालयात दुपारी लग्नासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ जमा होवू लागले होते. नवरदेवाने पारण्याआधी सगळ्यांच्या आग्रहावरुन झिंगाट वर ठेका धरत आपल्या लग्नाचा आनंद साजरा केला. तर दुसरीकडे वधू शारदाला महिलांनी हळद लावली. पारणे वाजत गाजत गावात गेले, यावेळी वरातीत तरुणाईनेही ठेका धरला. पारण्याला मारुतीचे दर्शन घेऊन नवरदेव अखेर घोड्यावरून कडेवर बसत थेट बोहल्यावर उभारला. वऱ्हाडी मंडळींनी विशाल व शारदाचा रुखवत पाहण्यासाठी देखील गर्दी केली. वधूवरांची उंची पाहता कमी उंचीचा आंतरपाट घेऊन ब्राह्मण मंडळी चक्क मांडी घालून बसली होती. शेवटची मंगलाष्टका झाल्यावर दोघांनी एकमेकांना हार घातले आणि हा अनोखा विवाह संपन्न झाला. विवाहानंतर वधूवरांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पाहुणे मंडळींनी गर्दी केली होती. या लग्नाला सांगोला तालुक्याच्या सभापती श्रुतिका लवटे यांच्यासह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य, विविध गावांचे सरपंच उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget