(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तूर डाळीचे भाव गगनाला भिडणार? पावसा अभावी घटलेलं उत्पादन अन् जागतिक बाजारपेठेतील वाढत्या मागणीचा परिणाम
Dhule Tur Dal Expensive: असमाधनकारक पावसाचा परिणाम डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनावर झालं आहे. अशातच उत्पादन घटल्यानं तुरीच्या डाळींचे दर आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Dhule Tur Dal Expensive: यंदा राज्यातील (Maharashtra Rains) बहुतांश जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस (Monsoon Updates) झालेला नाही. यामुळे याचा परिणाम खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांवर झाला आहे. यात तूर (Tur Dal), मूग (Mung Dal), उडीद यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे, त्याचा परिणाम डाळींच्या दरवाढीवर होणार असून सध्या किरकोळ बाजारात तूर 172 रुपये किलो असल्यानं दिवाळीपर्यंत (Diwali 2023) हे दर दोनशे रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
असमाधनकारक पावसाचा परिणाम डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनावर झालं आहे. अशातच उत्पादन घटल्यानं तुरीच्या डाळींचे दर आणखी वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दिवाळीच्या दिवसांत तूर डाळीला मागणी मोठ्या प्रमाणावर असते, यातच उत्पादनात घट झाल्यानं दरांत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या 172 रुपये प्रतिकिलो दरानं तूर डाळीची खरेदी करावी लागत आहे. तसेच, जागतिक बाजारपेठेत तूर डाळीला मागणी वाढल्यानं हे भाव वाढल्याचं देखील सांगण्यात येत आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर तूर डाळीचं भाव वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दिवाळीच्या तोंडावर हे भाव दोनशे रुपये किलोंवर जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, आधी पावसानं पाठ फिरवली आणि त्यानंतर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे महाराष्ट्रातील शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन पावसाळ्यात जमिनी कोरड्याठाक पडला. अनेक भागांत तर दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकरी हवालदील झाल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाहीतर अनेक भागांत आधीच कर्जानं बेजार झालेल्या बळीराजावर पुन्हा एकदा कर्ज घेण्याची वेळ आली. तसेच, काही ठिकाणी कमी पावसामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. उत्पादनात झालेली घट यामुळे येत्या काळात अनेक गोष्टींच्या किमतींत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सप्टेंबरमध्ये महागाई दर घसरला
सामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. सप्टेंबर महिन्यात घटल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. किरकोळ महागाई दर तीन महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर गेला आहे. जुलैमध्ये महागाईचा दर 7.44 टक्के होता, ऑगस्ट महिन्यात तो 9.94 टक्क्यांवर पोहोचला होता, सप्टेंबर महिन्यात तो 5.02 टक्क्यांवर घसरला. डिसेंबरपर्यंत किरकोळ महागाई दर कमीच राहिल्यास येत्या काळात रेपो रेटमध्ये देखील घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही