एक्स्प्लोर
तुमच्या राजाला साथ द्या..., गाण्यातून मनसेचं भावनिक आवाहन
मुंबई : 'एकटा पडला राजा, तुमच्या राजाला साथ द्या,' असं भावनिक आवाहन मनसेने गाण्यामधून केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेने थीम सॉन्ग लॉन्च केलं आहे.
मुंबईतील मनसैनिकांच्या मेळाव्यात गायक-संगीतकार अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचं थीम सॉन्ग सादर केलं.
मनसेने दादरमधील शिवाजी मंदिरात मेळावा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. राज ठाकरे यांनी यावेळी त्यांच्या शैलीत चौफेर फटकेबाजी करत उद्धव ठाकरे, शिवसेना, भाजप, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या गाण्याने मेळाव्यात चांगलाच जोश भरला. या गाण्याला पाचवेळा वन्समोअर मिळाला.
"परवा दुपारी गाणं सुचलं, काल काल सकाळी साहेबांनी ओके केलं. 70-80 कलाकारांनी या गाण्याला हातभार लावला. ते काल संध्याकाळपासून रात्रभर हे गाणं वाजवत होते. तेव्हा कुठे जाऊन हे गाणं तयार झालं," असं अवधूत गुप्तेने गाण्याबाबत सांगितलं.
मनसेचं थीम सॉन्ग
उठा उठा उठा उठा आभाळ फाटलंय,
वणव्याच्या आगीनं रान सारं पेटलंय,
झालाय राख बघा देश सारा,
तोंड दाबून बुक्क्यांचा वर मारा,
समुद्राच्या पोटातलं पाणीही आटलंय,
वेढा पडलाय गनिमांचा आता शत्रूला मात द्या,
तुमच्या राजाला साथ द्या
सिंहासनाचा कधी मोह न पडला
राजमहाली कधी जीव न अडकला
त्यागुनी सगळे ऐशोआराम, रात्रीची करुनी निंद हराम
बाहेर पडला मर्द गडी, राज्याची बसवाया घडी
पण पदरी पडली निर्भत्सना, आपलेच करती अवहेलना
आता एकटा पडलाय राजा, अशा चांगुलपणाची कसली सजा
गड वाचवायला हात द्या, तुमच्या राजाला साथ द्या
राज्याचे हाल काय झाले पाहा
टाळूवरचं लोणी खाया कुत्री दहा
वाघ गेला सोडून आता जंगलाला ना वाली
गब्बर की धाडकन तेच ताट खाली
धनुष्याला बाण नाही, बाणाला धार नाही,
तलवारी चार नाही, यांचं काही खरं नाही
ह्यांचं जाऊ दे झालं गेलं, तुमचं काय ते सांगा,
बँकेच्या रांगेत मिळते का जागा
माकडं होऊन गांधीची स्वप्नात रंगलात
येडा भुंगा होऊन कसे कमळात अडकलात
सुधरुया चूक, चला होऊया एक,
चला प्रगतीच्या गतीसाठी इंजिनाला मत द्या
तुमच्या राजाला साथ द्या....
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement