एक्स्प्लोर

हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस; इंधन तुटवड्याचं संकट उद्भवणार?

Truck Driver Strike: हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस असून पेट्रोल (Petrol) मिळणार नाही, या भीतीनं राज्यात अनेक पंपांवर रांगाच रांगा दिसतात.

Truck Driver Strike Petrol Shortage : मुंबई : हिट अँड रन कायद्याविरोधात (New Hit and Run Law) ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप (Transport Union Strike) पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस (Second Day Of Strike) आहे. त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर जाणार आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्याने नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर मोठ्या रांगा लावल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी महामंडळाकडे दोन दिवस पुरेल एवढाच डिझेलचा पुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे ट्रकचालकांच्या संपाचा एसटीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. 

ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना

हिट अँड रन कायदा विरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या सुरू केलेल्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे संपामुळे अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करण्यासाठी असलेल्या स्कूलबस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नसल्याने स्कूल बसेस रस्त्यावर धावणार नाही, असं स्कूल बस मालकांनी सांगितलं आहे. 

मुंबईत पेट्रोलसाठी वाहनधारकांच्या रांगा 

मुंबईतही या संपाचा परिणाम आता मुंबईतही दिसून येत आहे. काही दिवस पेट्रोलच्या टंचाईला जाण्याच्या भीतीने मुंबईतील कुर्ल्यातील पेट्रोल पंपावर काही लोकांनी ड्रममध्ये पेट्रोल भरुन नेलं. पेट्रोलबाबत व्हॉट्सअॅपवर मेसेज आल्याचं काही जणांनी सांगितलं. त्यानंतर पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी झाली.

नांदेडमधील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी

ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारल्यानंतर पेट्रोल पंपावर आज सकाळी 7 वाजल्यापासून गर्दी पाहिला मिळत आहे. नांदेडमध्ये काही पेट्रोल पंपावर 2 दिवस पुरेल एवढा इंधनाचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळपासून वाहनधारकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी पाहिला मिळत आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल पंपवर मोठी गर्दी

केंद्र सरकारनं मोटर अपघात कायद्यात बदल करून त्यात सुधारणा केली आहे. या विरोधात देशभरातील वाहनचालकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या कारणावरून देशभरातील वाहतूकदार आणि चालकांनी संप पुकारला आहे. त्यात पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारे सहभागी झाले आहेत. हे आंदोलन किती दिवस चालणार? हे निश्चित नाही, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होणार नाही, यामुळे एक दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल खरेदीसाठी गर्दी करत असल्याचं चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे. सकाळपासूनच पेट्रोल पंप मोठी गर्दी दिसून येत आहे.

राज्य सरकारचे जिल्हा प्रशासन, पोलिसांना आदेश

राज्यात पेट्रोल तुटवडा होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सगळ्याच जिल्ह्यात पेट्रोलपंपावर वाहन चालकांची गर्दी उसळली आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना शासनाकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश सरकारने दिले आहे. त्याशिवाय, तेल कंपन्यांना आवश्यक सहकार्य करा अशी सूचना देण्यात आली आहे. संपात सहभागी वाहतूकदारांकडून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत. 

नव्या कायद्यात आक्षेप कशावर?

नव्या मोटार वाहन कायद्यानुसार ट्रकमुळे एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्याला तात्काळ रुग्णालयात नेले पाहिजे, तसे न केल्यास आणि ट्रकचालक दोषी आढळून आल्यास त्याला सात वर्षांची शिक्षा आणि सात लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. भारतात 28 लाखांहून अधिक ट्रक चालक 100 अब्ज किलोमीटरचे अंतर कापतात. या ट्रकवर 50 लाखांहून अधिक लोकं काम करतात. अशा परिस्थितीत ट्रकमुळे होणारे रस्ते अपघातही सर्रास घडत आहेत. त्यामुळेच सरकारने नवीन कायदा आणला असल्याचं बोललं जात आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh Nagpur : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक; 4 जणांवर गुन्हा दाखलTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  11 AM :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaParinay Phuke on Anil Deshmukh : निवडणूक डोळ्यासमोर ठेवून देशमुखांनी कुभांड रचलं - परिणय फुकेABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Embed widget