Sanjay Raut Press Conference : 'मला टॉर्चर करा, कुटुंबियांना का त्रास?,' मोदी यांच्यासह शाह यांना राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut Press Conference : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपसह केंद्र सरकारवर चौफेर टीका केली.
Sanjay Raut Press Conference : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत विरोधकांवर चौफेर टीकास्त्र सोडलं. केंद्राकडून ईडी आणि इतर तपास यंत्रणांचा दुरपयोग होत असून माझ्या जवळच्या व्यक्तींना त्रास देत असल्याचा आरोप यावेळी राऊत यांनी केला. तसंच लोकशाहीमध्ये असं होत असेल तर 'हीच का तुमची लोकशाही?' असा सवालही राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना थेट विचारला.
राऊत यांनी यावेळी ईडीच्या कारवाईबाबत बोलताना प्रतिक्रिया दिली की, 'मी ज्यावेळीही महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही असं म्हणायचो तेव्हा, तेव्हा ईडीच्या धाडीचं सत्र माझ्या जवळच्या व्यक्तींवर सुरु होत होतं. माझ्या नातेवाईकांसह मित्रपरिवारावरही ईडीच्या धा़डी पडू लागल्या. दरम्यान माझ्या मुलीच्या लग्नात मेहंदी, नेल पॉलिश करणाऱ्यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली असून तिहार जेलमध्ये टाकण्याची धमकी देखील त्यांना देण्यात आली, असं विधानही संजय राऊत यांनी केलं.
राऊतांचा शाहंना फोन
या साऱ्यानंतर राऊत यांनी माझ्याशी वैर असल्यास मला टॉर्चर करा, कुटुंबियांना का त्रास? असा सवाल विचारला. तसंच ज्या दिवशी कुटुंबीयांना त्रास दिला, जवळच्या लोकांना त्रास दिला त्यावेळी अमित शाह यांना फोन केला. तुमच्याबद्दल आदर, देशाचे गृहमंत्री आहात, माझ्यावर राग असेल तर मला अटक करा, असे कृत्य बंद करा, असंही राऊत म्हणाले.
- Sanjay Raut: PMC घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानचा किरीट सोमय्यांशी आर्थिक संबंध, किरीट सोमय्या आणि निल सोमय्यांना अटक करा: संजय राऊत
- Sanjay Raut : 'मुलुंडचा दलाल', किरीट सोमय्या यांच्यावर संजय राऊतांनी सोडला टीकेचा बाण
- Shivsena leader Sanjay Raut Press Conference Key Highlights : संजय राऊत यांची स्फोटक पत्रकार परिषद; जाणून घ्या प्रमुख मुद्दे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha