Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 27 एप्रिल 2022 : बुधवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. पंतप्रधान मोदींची देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर खल होणार, तर मास्कसक्ती पुन्हा लागू करण्याचा राज्य टास्क फोर्सचा सल्ला
2. डी कंपनीशी संबंधित युसुफ लकडावालाकडून नवनीत राणांनी 80 लाखांचं कर्ज घेतलं, राऊतांचा आरोप, चौकशीसंदर्भात ईडीला प्रश्न
3. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंवर बनावट एफआयआरचा आरोप करणारे सोमय्या आज राज्यपालांच्या दरबारात, तर हल्ल्यावेळी सीआयएसएफ काय करत होतं, पांडेंचा प्रतिसवाल
4. मुंबई, कोल्हापूर आणि सातारा पोलीस कोठडीची हवा खाल्ल्यानंतर 18 दिवसांनी वकील सदावर्ते तुरुंगाबाहेर, 18 दिवस फक्त पाण्यावर काढल्याचा अजब दावा
5. रश्मी शुक्ला केंद्रस्थानी असलेल्या फोन टॅपप्रकरणी 700 पानांचं आरोपपत्र, एकनाथ खडसे आणि संजय राऊतांसह शासकीय कर्मचाऱ्यांच्या जबाबाचा समावेश
6. राज्यमंत्री बच्चू कडू अडचणीत, 1 कोटी 95 लाखांच्या अपहाराचा आरोप, गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7. पदवीचा अभ्यासक्रम तीनवरुन चार वर्षांचा! एक समान शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी राज्याची समिती
8. राज्यातील चेक पोस्ट बंद होण्याची शक्यता, गृह विभागाचे परिवहन विभागाला पत्र
Maharashtra News : राज्यातील चेक पोस्ट बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, यासंबंधित गृह विभागाचे परिवहन विभागाला तसे पत्रही प्राप्त झाल्याची माहिती सुत्रांकडून समजत आहे. परिवहन विभागात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सरकारचे मोठे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे.
पुढील 3 महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना
9. राज ठाकरेंच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मनसे नेते बाळ नांदगावकर आज औरंगाबाद दौऱ्यावर
10. एलआयसी आयपीओचा प्राईज बँड जवळपास निश्चित, आकडा 902 ते 949 च्या घरात असणार, पॉलिसीधारकांना 60 रुपयांचा डिस्काऊंट