एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 फेब्रुवारी 2021 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 फेब्रुवारी 2021 | सोमवार
- शेतकऱ्यांनी आंदोलन संपवावं, चर्चेतून प्रश्न सोडवू; राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आंदोलक शेतकऱ्यांना आवाहन https://bit.ly/3tC3Dzg कृषी कायद्यांना पाठिंबा देणाऱ्यांनी यू-टर्न घेतला, राज्यसभेत पंतप्रधानांचा शरद पवारांवर निशाणा https://bit.ly/2N7urGE
- शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटची चौकशी होणार, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती https://bit.ly/3jxRd6L 'भारतरत्नांची चौकशी करणारे ‘रत्न’ कुठेही सापडणार नाहीत', सेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी करण्यावरुन फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल https://bit.ly/2MDERhE
- सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील?; सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर स्वाभिमानीची निदर्शनं https://bit.ly/3rxp3eT शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते, सचिनला दिलेल्या सल्ल्यावरुन सदाभाऊ खोत यांचा निशाणा https://bit.ly/2MBekBB
- काँगेस असा शून्य आहे ज्याच्याकडे विश्व निर्माण करण्याची क्षमता, काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य, गेल्या काही वर्षात झालेल्या चुका दुरुस्त करुन पुढे जाण्याचाही निर्धार https://bit.ly/3qdnDGt
- भाजपने विश्वासघात केल्याची भावना शिवसेनेमध्ये होती; देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचा टोला https://bit.ly/3tG8VKe
- अरबी समुद्रातील शिवस्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी भुयारी रेल्वेच्या पर्यायाची तपासणी, अशोक चव्हाण यांची माहिती https://bit.ly/3tx4eCl
- उत्तराखंड हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना, आतापर्यंत 18 जणांचे मृतदेह हाती, तर 202 जण बेपत्ता, सैन्याकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु, मृतांच्या नातेवाईकांना राज्याकडून चार तर केंद्राकडून दोन लाखांची मदत https://bit.ly/3tBs8wo
- नागपुरात पुन्हा जमावाकडून गुंडाची हत्या; दगड, विटांनी ठेचून आणि चाकूने भोसकून विजय वागधरेचा खून https://bit.ly/3tC2mIh गुंडाना जमावाने ठेचून मारणे हा नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा इतिहासच https://bit.ly/3tC2mIh
- पाच महिन्यांच्या तीराच्या औषधांच्या करमाफीबाबत सकारात्मक पाऊल, तीराला परदेशातून येणाऱ्या औषधावर करमाफी देण्यासाठी आरोग्य विभागाचं पत्र https://bit.ly/36VPV0u
- भारत वि. इंग्लंड चेन्नई कसोटी रोमांचक स्थितीत, यजमान भारतासमोर 420 धावांचं आव्हान, चौथ्या दिवसअखेरीस भारताच्या 1 बाद 39 धावा, विजयासाठी पाचव्या दिवशी 381 धावा बनवाव्या लागणार https://bit.ly/3cQ4VAL
आणखी वाचा























