एक्स्प्लोर
जगण्यासाठी सर्वात सुंदर शहरांमध्ये पुणे अव्वल, मुंबई कितव्या स्थानी?
शहरांची निवड करताना संस्था आणि प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा यात शिक्षण आणि आरोग्य, त्याचबरोबर आर्थिक घटक आणि पायाभूत सुविधा या घटकांचा विचार करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि ठाणेकरांना अभिमान वाटेल अशी बातमी आहे. कारण, राहण्यासाठी, किंबहुना जगण्यासाठी सर्वात चांगल्या शहरांच्या यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये या शहरांचा समावेश झालाय. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने ही यादी आज जाहीर केली. शहरांची निवड करताना संस्था आणि प्रशासन, सामाजिक पायाभूत सुविधा यात शिक्षण आणि आरोग्य, त्याचबरोबर आर्थिक घटक आणि पायाभूत सुविधा या घटकांचा विचार करण्यात आला आहे. देशातील पहिल्या दहा शहरांच्या यादीत पुण्याचा पहिला क्रमांक आहे. तर नवी मुंबई दुसऱ्या, मुंबई तिसऱ्या तर ठाण्याचा सातवा क्रमांक आहे. देशभरातील दहा शहरं पुणे नवी मुंबई मुंबई तिरुपती चंदीगड ठाणे रायपूर इंदूर विजयवाडा भोपाळ
आणखी वाचा























