एक्स्प्लोर

Todays Headline 18th June : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या 

National News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
 
विधानपरिषदेची निवडणूक दोन दिवसांवर, सर्वपक्षीयांचं हॉटेल पॉलिटिक्स सुरु  
विधानपरिषदेची निवडणूक दोन दिवसांवर आली असून त्यामुळे राज्यातील राजकारणाची चक्रं वेगाने फिरत आहेत. शिवसेना आमदारांना कालपासून पवईच्या वेस्टीन हॉटेलला थांबवण्यात आलं आहे तर भाजपचे आमदार हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे मुक्कामी आहेत. आज संध्याकाळी 5 भाजपा आमदारांची बैठक होणार आहे.

काँग्रेसच्या आमदारांना आज दुपारपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आलेत. फोर सिजन हॉटेलमध्ये काँग्रेस आमदारांची राहण्याची व्यवस्था होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता फोर सिजन हॉटेल मध्ये काँग्रेसची बैठक होणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे सगळे आमदार आणि राष्ट्रवादीला पाठींबा देणारे आमदार आज मुंबईतील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये सकाळी 11 वाजता पोहचणार आहेत. या आमदारांना आज राष्ट्रवादीचे प्रमुख नेते रात्री 7 वाजता मार्गदर्शन करणार आहेत.

आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकत्रितपणे बैठक होणार आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपला उमेदवार निवडून यावा यासाठी मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

अग्निपथला विरोध सुरूच
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या अग्नीपथला देशाच्या विविध भागातून विरोध सुरुच आहे. काही विद्यार्थी संघटनांकडून आज भारत बंदची घोषणा करण्यात आली आहे. विशेषत: बिहारमध्ये या बंदचे परिणाम दिसतील. देशाच्या इतर भागातही काही परिणाम दिसू शकतो. आरजेडी, सीपीएम, सीपीआय,बिहार काँग्रेस आदी पक्षांनी या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. 

पंतप्रधानांचा गुजरात दौरा, आईची भेट घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज गुजरात दौरा आहे. या दरम्यान 100 व्या वाढदिवसानिमित्त आईसोबत मोदींची खास भेट होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते गुजरातमध्ये 21 हजार कोटींच्या विविध योजनांचं उद्घाटन होणार आहे. मोदींचा सविस्तर दौरा पुढीलप्रमाणे-
-सकाळी 7 वाजता- मोदी आई हिराबेन यांची 100 व्या वाढदिवसानिमित्त भेट घेणार आहेत. हिराबेन यांचा जन्म 18 जून 1923 ला झाला होता.
- सकाळी 9.15 वाजता- मोदींच्या हस्ते कालिका मातेच्या पुननिर्मित मंदिराचं उद्घाटन.
-सकाळी 11.30 वाजता- मोदी पावागढ येथील विरासत वनाची यात्रा करणार आहेत.
-दुपारी 12.30 वाजता- मोदींच्या हस्ते 21 हजार कोटींच्या विविध योजनांचं उद्घाटन होणार आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget