एक्स्प्लोर
Advertisement
LIVE UPDATES | वणी तालुक्यातील डोरली गावाच्या नाल्याला आलेल्या पुरात 3 जण वाहून गेले
जगभरात कोरोना महामारीचा धोका वाढत चालला आहे. जगात 1.21 कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगात एक कोटी 21 लाख 55 हजार कोरोनाबाधिता आहेत. तर कोरोनामुळं मृत्यूची संख्या 5 लाख 51 हजार वर गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 70 लाखांहून अधिक लोकं कोरोनामुक्त झाली आहेत. अमेरिकेत सर्वाधिक 3,158,726 कोरोनाबाधित आहेत. अमेरिकेत 134,853 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. तर ब्राझिल दुसऱ्या नंबरवर असून 1,716,196 लोकं तिथं बाधित झाली आहेत. तर 68,055 लोकांचा मृत्यू झालाय. या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात 769,052 कोरोनाबाधित आढळले आहेत तर आतापर्यंत 21,144 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे. कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
जगभरात कोरोना महामारीचा धोका वाढत चालला आहे. जगात 1.21 कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगात एक कोटी 21 लाख 55 हजार कोरोनाबाधिता आहेत. तर कोरोनामुळं मृत्यूची संख्या 5 लाख 51 हजार वर गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 70 लाखांहून अधिक लोकं कोरोनामुक्त झाली आहेत. अमेरिकेत सर्वाधिक 3,158,726 कोरोनाबाधित आहेत. अमेरिकेत 134,853 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. तर ब्राझिल दुसऱ्या नंबरवर असून 1,716,196 लोकं तिथं बाधित झाली आहेत. तर 68,055 लोकांचा मृत्यू झालाय. या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात 769,052 कोरोनाबाधित आढळले आहेत तर आतापर्यंत 21,144 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झाला आहे.
05:35 AM (IST) • 09 Jul 2020
शिराळा तालुक्यातील शंभरी पार केलेल्या वृद्धाला 27 जून रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. दरम्यान, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यापूर्वी या रुग्णालयातील 94 वय असणाऱ्या एका वृद्ध महिलेनेही कोरोनावर मात केली होती. त्यानंतर या दुसऱ्या वृद्धाने कोरोनावर मात केली आहे. यामुळे योग्य उपचारातून कोरोनावर मात करता येते हे दिसून आले आहे. मिरजेच्या कोरोना रुग्णालयातून कोरोना बाधित आणि संशयित असणाऱ्या रुग्णांवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयातील कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज दिवसभरात सुमारे पंधरा जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या या रुग्णालयात 80 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
18:44 PM (IST) • 09 Jul 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही मंत्री थेट वर्षा बंगल्यावर पोहचणार आहेत. तर काही ऑनलाइन सहभागी होणार आहेत. राज्यातील करोनाची स्थिती, लॉकडाउन या सगळ्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीत नेमका काय विषय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र लॉकडाउनबाबत काय निर्णय घ्यायचा? यावरची चर्चा कदाचित या बैठकीत होऊ शकते.
20:00 PM (IST) • 09 Jul 2020
पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाच्या कामास गती येणार. विरार-डहाणू मार्गाचेही चौपदरीकरण होणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एमयुटीपी-3 सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या.
20:12 PM (IST) • 09 Jul 2020
राज्यात आज 6875 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 230599 अशी झाली आहे. आज नवीन 4067 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 127259 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 93652 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
20:29 PM (IST) • 09 Jul 2020
सोनी लिव्ह वरच्या सँडविच मधून अभिनेता कंवलजीत सिंह बाहेर. नव्या नियमानुसार 65 वर्षांवरील अभिनेत्यांना बंदी असल्याने 65 वर्षांच्या आतील कलाकाराला देण्यात संधी आली आहे.
Load More
Tags :
Coronavirus Total Cases In India Coronavirus News In India India Corona Cases Coronavirus India Total Cases Coronavirus Death In India Coronavirus Worldometer In India Todays Breaking News Maharashtra Live Updates Unlock News Coronavirus In India India Coronavirus Cases Coronavirus Cases Coronavirus Cases In India India Coronavirus Update Coronavirus News India Coronavirus Worldometer Coronavirus Worldometer India Coronavirus India Worldometer Worldometer India Coronavirus China Coronavirus Update In India Coronavirus India Live India Coronavirus Death Corona In India World Coronavirus Cases Of Coronavirus In India Rain In Mumbai Lockdown Coronavirus News Coronavirus Update Coronavirusमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
क्रीडा
भारत
Advertisement