एक्स्प्लोर
LIVE UPDATES | पुढील दोन दिवसात राज्य मंत्रीमंडळातील खातेवाटपावर निर्णय होण्याची शक्यता

Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
- हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचं एन्काऊंटर, सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा मृत्यू
- सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजितदादांना क्लीन चिट, एसीबीनं हायकोर्टात सादर केलेल्या अहवालात नियमबाह्य व्यवहार नसल्याचं स्पष्टीकरण
- पुण्यातल्या पोलीस परिषदेनिमित्त मोदी-उद्धव एकाच कार्यक्रमात, युती तोडून सेनेनं आघाडीसोबत सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच आमनेसामने
- ठाकरे सरकारचा नवा दणका, नगर विकास खात्याचा निधी रोखला, फडणवीसांनी घेतेलेल्या निर्णयांना ब्रेक लावनं सुरुच
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज 63 वा महापरिनिर्वाणदिन, राज्यभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर, एबीपी माझावरही खास कार्यक्रम
- हैदराबादेत आज भारत -वेस्ट इंडिजमध्ये पहिला टी-२० सामना, टीम इंडियाचा विजयी वारु रोखण्याचं वेस्ट इंडिजसमोर आव्हान
23:49 PM (IST) • 06 Dec 2019
बाजारसमित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार :- राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना वाढीव दराने खरेदी करावी लागत आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्या खरेदी - विक्रीची गैरसोय होवू नये यासाठी बाजारसमित्यांचे व्यवहार सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत. पणन संचालनालयांच्या वतीने परिपत्रकाद्वारे बाजार समित्यांना त्याबाबत कळवण्यात आले आहे.
21:01 PM (IST) • 06 Dec 2019
पुढील दोन दिवसात राज्य मंत्रीमंडळातील खातेवाटपावर निर्णय होण्याची शक्यता :- खातेवाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या नेहरु सेंटर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडली. बैठकीला राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, उपस्थित होते. या बैठकीवेळी खातेवाटप लवकर करा अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. त्यामुळे पुढील दोन दिवसात खातेवाटपावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्या संध्याकाळी पुन्हा शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादीची खातेवाटपावर बैठक होण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार होईपर्यंत तूर्तास गृह विभाग मुख्यमंत्र्यांकडेच असावा असा सूर बैठकीत पाहायला मिळाला.
Load More
Tags :
Aaj Divasbharat Today\'s News In Marathi Marathi News Trending News Abp Majha Latest Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























