दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना उद्या फाशी नाही, दिल्लीच्या पटियाला कोर्टाकडून पुढील आदेशापर्यंत फाशीला स्थगिती
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित, चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 213 जणांचा मृत्यू
2. मित्राच्या हत्येचा सूड उगवण्यासाठी दिल्लीतल्या सीएए मोर्चात गोळीबार, राजधानी हादरली, हल्लेखोराची गय करणार नाही, अमित शाहांचं ट्वीट
3. पुण्यात उर्मिला सहभागी झालेल्या सीएए विरोधी जनआंदोलनात हिंदुत्त्ववादी संघटनेचा गोंधळ, घोषणाबाजी करणारे पोलिसांच्या ताब्यात, गोंधळ घालणाऱ्यांना उर्मिलाचा टोला
4. कोरेगाव भीमा हिंसाचारामागे भाजपचा हात, गृहमंत्री अनिल देशमुखांच्या आरोपानंतर भाजपचा संताप, आरोप सिद्ध करण्याचं मुनगंटीवारांचं आव्हान
5. फडणवीसांनी सुरू केलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीडला ब्रेक लागण्याचे संकेत, तर भाजप सरकारकडून नियुक्त 19 साखर कारखान्यांचे संचालक हटवले
6. कोकणचा हापूस वाशी एपीएमसीत दाखल, व्यापाऱ्यांकडून पेटीची पूजा, तर बदलापुरात शेतकऱ्याकडून स्ट्रॉबेरी पिकवण्याचा यशस्वी प्रयोग
एबीपी माझा वेब टीम