ऐन हिवाळ्यामध्ये परभणी शहरासह अनेक तालुक्यांमध्ये आज मुसळधार पाऊस
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. जुन्या आणि नव्या टॅक्स स्लॅबनुसार आयकर भरण्याचा पर्याय, अर्थसंकल्पात करकपातीची घोषणा, मात्र स्टँडर्ड डिडक्शनसारख्या करसवलतींना कात्री
2. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी 16 कलमी कार्यक्रम, शेती, सिंचन आणि ग्रामविकासासाठी 2 लाख 83 हजार कोटी, सौरउर्जा वापरावर विशेष भर
3. रोजगारनिर्मितीसाठी इन्फ्रास्ट्रक्टचरमध्ये 5 वर्षांत 100 लाख कोटी गुंतवणार, एलआयसी आणि आयडीबीआय़मधले समभाग विकून पैसा उभा करणार
4. लग्नाप्रमाणेच मातृत्त्वाच्या वयासंदर्भात कायदा आणण्याचे अर्थमंत्र्यांचे संकेत, टास्क फोर्सची घोषणा, महिलांसाठी 28 हजार कोटींचा निधी
5. गड किल्ल्यावर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना सहा महिने सश्रम कारावास, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय, दहा हजार रुपये दंडाचीही तरतूद
6. पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते वसई रोडदरम्यान आज जंबो मेगाब्लॉक, सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक राहणार बंद.