Maharashtra Crisis LIVE | ओळख परेड हा पोरखेळ : आशिष शेलार
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
25 Nov 2019 08:26 PM
केंद्राची सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांनी बहुमत नसताना काही राज्यात सत्ता स्थापन केली. कर्नाटक, गोवा, मणीपूर येथे चुकीच्या पद्धतीने सत्तास्थापन केली. काही जनांनी संपर्क साधला मात्र लिखीत स्वरुपात समर्थन मिळालेलं नाही. त्यामुळे इथं नावं सांगत नाही. उद्या सुप्रीम कोर्टात काही तरी निकाल लागेल. काही गैरसमज निर्माण केले जात आहेत. उद्या राष्ट्रवादीने अजित पवार यांनी निवड केली त्यांनी गैरवापर केला म्हणून त्यांचं पद रद्द केलं.
आज महाराष्ट्राने एक ओळख परेड पहिली. हा एक पोरखेळ होता.ओळख परेड करून जनतेने निवडून दिलेल्या आमदारांचा आणि जनतेचा अपमान केला आहे
फोटोग्राफर तुमचा, फोटो तुमचा परंतु त्याचं फोटॊ फीनीश आम्हीच करू. सगळ्या घटनाक्रमामुळे सर्व मराठी माणसांनी शरमेने मान खाली घातली असेल.आदित्य ठाकरेंनी खुर्चीसाठी सोनिया गांधींच्या नेतृत्वातील आमदारांसोबत शपथ घेतली आहे.
आज महाराष्ट्राने एक ओळख परेड पहिली. हा एक पोरखेळ होता.ओळख परेड करून जनतेने निवडून दिलेल्या आमदारांचा आणि जनतेचा अपमान केला आहे
फोटोग्राफर तुमचा, फोटो तुमचा परंतु त्याचं फोटॊ फीनीश आम्हीच करू. सगळ्या घटनाक्रमामुळे सर्व मराठी माणसांनी शरमेने मान खाली घातली असेल.आदित्य ठाकरेंनी खुर्चीसाठी सोनिया गांधींच्या नेतृत्वातील आमदारांसोबत शपथ घेतली आहे.
ग्रॅंड हयातमधील ग्रॅंड शक्तिप्रदर्शनाला सुरुवात, 162 आमदार एकाच छताखाली
अमरावती शहरातील वालकट कम्पाऊंड परिसरातील जाफरजीन प्लॉट येथे आज दुपारी 1 च्या सुमारास एका 47 वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. शेख हसन शेख हुसैन ऊर्फ नानिका हसन असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. न्यायालयातील एका प्रकरणात तारखेसाठी उपस्थित राहून तो दुचाकीने वालकटमार्गे घराकडे निघाला होता. त्यावेळी, हा हल्ला करुन त्याचा खून करण्यात आला आहे.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीनचिट,
विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळाच्या 9 फाईल बंद करण्यात आल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, सध्या भाजपला पाठिंबा देणाऱ्या अजित पवारांना दिलासा देण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीनचिट,
विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळाच्या 9 फाईल बंद
सत्तेची वाट पाहताना संजय राऊतांना वेड लागलं आहे : दानवे
संजय राऊतांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा : दानवे
अजित पवारच राष्ट्रवादीचे गटनेते,
अजित पवार जो व्हिप काढतील तोच लागू होणार : रावसाहेब दानवे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शदर पवार साताऱ्याहून मुंबईत दाखल , हेलिकॉप्टरने मुंबईत परतले
अजित पवारांचे मन वळवण्यात वळसे-पाटील, भुजबळांना अपयश, चर्चा सुरु असल्याचे भुजबळांचे वक्तव्य
अजित पवार यांच्यासोबत सुरु असलेली राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक 4 तासांनंतर संपली. यात दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ यांचा समावेश होता.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शीघ्र कृती दल पाठवण्यात आलं आहे, विशेषत शिवसेनेचे बळ असलेल्या जिल्ह्यांमध्ये शीघ्र कृती दलाच्या दोनपेक्षा अधिक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शीघ्र कृती दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या जिल्ह्यांमध्ये अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. या जिल्ह्यांमध्ये दोन पथकं तैनात केली आहेत. तर राजभवन परिसरातही कडेकोट बंदोबस्त आहे.
विश्वासदर्शक ठरावासाठी 14 दिवसांची मुदत, बहुमत सिद्ध करण्यासाठी आता सात डिसेंबरपर्यंत मुदत?
शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल बोलण्यासाठी उभे राहिल्यावर न्यायमूर्ती रमण यांनी विचारलं, आणखी काही युक्तिवाद बाकी आहे?
हे विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवर एवढा भर का दिला जात आहे? जेणेकरुन अजित पवार व्हीप जारी करुन आमदारांना अपात्र ठरवू शकतील : (अभिषेक मनु सिंघवी, राष्ट्रवादीचे वकील). या युक्तिवादाला मुकूल रोहतगी यांनी जोरदार आक्षेप घेतला. उद्या 10.30 वाजता न्यायमूर्ती आदेश देणार
जेव्हा विधानसभेचं सत्र होईल, तेव्हा ज्यांचे जास्त आमदार असतील, त्यांचा अध्यक्ष होईल. हेच घटनासंमत आहे. हंगामी अध्यक्ष फक्त शपथ देतात. अध्यक्षांची निवड झाल्यावर विरोधी पक्षनेत्याची निवड होते. मग विश्वासदर्शक ठराव मांडला जातो. ही प्रक्रिया बदलली जाऊ शकत नाही : मुकूल रोहतगी (भाजपचे वकील)
यापूर्वी अशा अनेक प्रकरणांमध्ये कोर्टाने अध्यक्षांची निवडीच्या प्रक्रियेची वाट पाहिलेली नाही : (कपिल सिब्बल, शिवसेनेचे वकील)
राज्यपालांनी काही अनेक महिन्यांची मुदत दिलेली नाही. हे लोक बोलत आहेत की, कोर्टाने अधिवेशन बोलवावं. म्हणजे कोर्टाने हेही सांगावं का, नाश्ता कधी करायचा, जेवण कधी करायचं? : मुकूल रोहतगी (भाजपचे वकील)
मुकूल रोहतगी 2007 च्या राजाराम पाल प्रकरणाचा संदर्भ देत आहेत. हे लोक तातडीने अधिवेशन बोलावण्याची मागणी करत आहेत.
त्यांनी याचिका एक दाखल केलीय मात्र वकील अनेक आहेत : तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)
सिंघवी यांची कोर्टाला सूचना, एक विशेष अधिवेशन बोलवा, ज्यात फक्त बहुमत परीक्षण होईल. त्यावर न्यायमूर्ती रमण म्हणाले, काय आदेश द्यायचाय तो आम्हाला ठरवू द्या.
ठीक आहे, आम्ही बहुमत चाचणीत हरलो तरी चालेल, पण चाचणी आजच घ्या : अभिषेक मनु सिंघवी, राष्ट्रवादीचे वकील
आता जी नवी यादी दिली जात आहे, त्यातही अनेक आमदारांची नावं आहेत : तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)
सभागृहातील सर्वात ज्येष्ठ आमदारांना हंगामी अध्यक्ष बनवून तातडीने बहुमत चाचणी केली पाहिजे : अभिषेक मनु सिंघवी, राष्ट्रवादीचे वकील)
मला विनाकारण चर्चा वाढवायची नाही. पण आजच बहुमत चाचणीचे आदेश दिले पाहिजेत यासाठी पुरेशी सशक्त कारणं आहेत : अभिषेक मनु सिंघवी, राष्ट्रवादीचे वकील)
ही याचिका खूप मर्यादित आहे, पण दोन्ही पक्ष याला विनाकारण वाढवत आहे : न्यायमूर्ती खन्ना
रोहतगी आणि सिंघवी यांच्यात जोरदार वादावादी. न्यायमूर्ती रमण यांनी शांत राहण्यास सांगितलं.
दोन्ही पक्षा सभागृहातील बहुमत चाचणी योग्य असल्याचं म्हणत आहेत. तर मग उशीर कशाला? या संदर्भात कोर्टाचे जुने निर्णय आहेत, त्यांच्या अवहेलना करता येणार नाही. आमदारांच्या सह्या आहेतच, पण कोणीच भाजपला पाठिंबा देतोय असं म्हटलेलं नाही. म्हणून ही फसवणूक आहे. अजित पवारांना गटनेता निवडण्यासाठी केलेल्या सह्या, समर्थनाच्या पत्रासोबत जोडल्या आहेत : अभिषेक मनु सिंघवी, राष्ट्रवादीचे वकील)
ठीक आहे. अजित पवार यांची हकालपट्टी झाली आहे. स्थिती बदलली आहे. आता 24 तासात बहुमत चाचणीचे आदेश द्या : (कपिल सिब्बल, शिवसेनेचे वकील)
पण याचा उल्लेख तुमच्या याचिकेत नाही. यावर बोलू नका : न्यायमूर्ती खन्ना
पंतप्रधानांच्या विनंतीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय निर्णय ही आणीबाणीची तरतूद आहे : (कपिल सिब्बल, शिवसेनेचे वकील)
सकाळी आठ वाजता शपथविधी करण्यासारखं काय राष्ट्रीय संकट ओढवलं होतं? राष्ट्रपतींना रात्री अहवाल पाठवून सकाळी 5.47 वाजता राष्ट्रपती राजवट उठवली? आतापर्यंत सबुरीने काम करणाऱ्या राज्यपालांनी अचानक एवढी घाई का केली? : (कपिल सिब्बल, शिवसेनेचे वकील)
राज्यपालांनी पत्राच्या आधारे निर्णय घेतला : न्यायमूर्ती
तुम्ही राष्ट्रपती राजवट उठवण्याला आव्हान दिलेलंच नाही : मुकूल रोहतगी (भाजपचे वकील)
22 नोव्हेंबरला एक पत्रकार परिषद झाली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र आल्याची घोषणा झाली. ही पत्रकार परिषद संध्याकाळी 7 वाजता झाली आणि पहाटे 5 वाजता राष्ट्रपती राजवट उठवली. एवढी घाई कसली? : (कपिल सिब्बल, शिवसेनेचे वकील)
शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु
कोणत्याही अंतरिम आदेश या प्रकरणी देऊ नये. मुख्यमंत्र्यांना सविस्तर उत्तर देण्यास वेळ मिळायला हवा : मुकूल रोहतगी (भाजपचे वकील)
यानंतर जर काही आमदारांना शरद पवारांना जावं वाटलं तर त्याबाबत राज्यपाल निर्णय घेतील. त्यात कोर्टाने पडू नये : (मनिंदर सिंह, अजित पवारांचे वकील)
कलम 32 नुसार दाखल या याचिकेची सुनावणी कोर्टाने करायला नको. त्यांनी हायकोर्टात दाद मागावी : (मनिंदर सिंह, अजित पवारांचे वकील)
राज्यपालांना जे समर्थनाचं पत्र दिलं ते कायदेशीर होतं. मग त्यावर आता वाद का? मीच राष्ट्रवादी आहे. हेच सत्य आहे : (मनिंदर सिंह, अजित पवारांचे वकील)
त्यांनी सगळ्या आमदारांना जोरजबरदस्तीने पकडून ठेवलं आहे. त्यांना फुटीची भीती आहे. त्यामुळे ते गडबड करत आहेत. तुमच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम होतील. म्हणून सविस्तर सुनावणी करुन निर्णय घ्या : तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)
आम्हाला सविस्तर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ द्या. अशाप्रकारच्या प्रकरणात कोर्टाने यापूर्वी दिलेल्या निकालांवरुन आता कोणताही आदेश देऊ नका : तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)
राज्यपालांनी त्यांच्या विवेकानुसार निर्णय घेतला. त्यांना आता काळजी आहे की आहे ते आमदारही सोडून जातील, म्हणून ते घाई करत आहेत. यात कोर्टाने पडू नये. विधानसभेची कारवाई कशी व्हावी हे देखील कोर्टाने सांगू नये. यात कोर्टाने हस्तक्षेप करु नये : तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)
जर त्यांच्या मुख्य याचिकेतच काही अर्थ नाही तर बहुमत लवकर सिद्ध करण्याचे आदेश देण्याची मागणी तरी का ऐकली जावी? : मुकूल रोहतगी (भाजपचे वकील)
माहित नाही. कदाचित त्यांच्यात अंतर्गत वाद असतील. पण आता जे होईल ते विधानसभेच्या पटलावर होईल. पण राज्यपालांना का टार्गेट केलं जात आहे. त्यांनी बहुमत चाचणीला नकार कधी दिला? कोर्ट त्याची तारीख ठरवू शकत नाही, राज्यपालांनी आधीच 30 तारीख ठरवली आहे : मुकूल रोहतगी (भाजपचे वकील)
आता काय स्थिती आहे, त्या आमदारांनी पाठिंबा मागे घेतला आहे का? : न्यायमूर्ती खन्ना
काल हे लोक सांगत होते की, राष्ट्रवादीचे 45 आमदार त्यांच्यासोबत आहेत. हे कोर्टरुममध्ये नाही तर बाहेर सांगितलं : मुकूल रोहतगी (भाजपचे वकील)
राज्यपालांनी पत्राच्या आधारावर निर्णय घेतला. या आव्हानाला काहीच अर्थ नाही : मुकूल रोहतगी (भाजपचे वकील)
या प्रकरणावर सविस्तर सुनावणीची गरज आहे. गडबडीत हे प्रकरण निकाली काढू शकत नाही : तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)
आता एक पवार आमच्यासोबत आहेत, दुसरे पवार दुसऱ्या बाजूला आहेत. त्यांच्या कौटुंबिक भांडणाशी आमचं काय घेणंदेण? हे लोक आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्या बनावट आहेत, असं म्हणत नाहीत. तर फसवून घेतल्या आहेत, असं म्हणतात. हे प्रकरण कर्नाटकपेक्षा वेगळं आहे : मुकूल रोहतगी (भाजपचे वकील)
आमच्या निवडणूकपूर्व मित्रपक्षाने साथ सोडली. मग राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. आम्हाला 170 आमदारांनी पाठिंबा दिला. म्हणून राज्यपालांनी बोलावलं : मुकूल रोहतगी (भाजपचे वकील)
तेव्हा राज्यपालांनी आमंत्रण दिलं. अशाप्रकारे त्यांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान कसं दिलं जाऊ शकतं? : तुषार मेहता
फडणवीसांच्या पत्रातील तपशील - मी भाजप विधीमंडळ पक्षाचा नेता आहे. मला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. अन्य 11 आमदारांचाही मला पाठिंबा आहे. एकूण 170 आमदार माझ्या सोबत आहेत : तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)
फडणवीसांच्या पत्रात काय लिहिलंय? कोर्टाची विचारणा
राज्यपालांकडे एवढे तपशील असताना त्यांनी वेगळी चौकशी करायला हवी होती का? त्यांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारावर निर्णय घेतला : तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)
राज्यपालांचं फडणवीसांना पत्र - तुम्ही तुमच्या पक्षाचे विधीमंडळ गटनेते आहात. तुम्हाला अन्य 11 आमदारांचाही पाठिंबा आहे. शिवाय अजित पवारांनी तुम्हाला पाठिंबा असल्याचं पत्र दिलं आहेत. मी तुम्हाला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करतो : तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)
राष्ट्रपती राजवट जास्त काळ चालू नये. यासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं. राज्यपालांनी फडणवीसांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित करावं. 54 आमदारांच्या समर्थनाच्या सह्या या पत्रासोबत आहेत. यानंतर राज्यपालांनी फडणवीसांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं, असा अजित पवारांच्या पत्रातील तपशील आहे : तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)
यानंतर अजित पवारांनी पाठिंब्यांचं पत्र दिलं. यावरील तारीख 22 नोव्हेंबर आहे. यावर लिहिलं आहे की, ते राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते आहेत. 54 आमदारांच्या सह्या या पत्रात आहे. मला सगळ्या आमदारांचा पाठिंबा आहे : तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)
राज्यपालांनी 9 नोव्हेंबरपर्यंत वाट पाहिली. सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रण दिलं. भाजपने असमर्थता दर्शवली. 10 तारखेला शिवसेना पोहोचली. त्यांनीही सरकार स्थापन करता आलं नाही. राष्ट्रवादीने 11 नोव्हेंबरला नकार दिला. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू केली. याचिकाकर्ते 12 नोव्हेंबरनंतर राज्यपालांकडे केले नाहीत. मी राज्यपालांची बाजू मांडतोय आहे : तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)
कलम 32 नुसार राज्यापालांच्या आदेशाला याचिकेद्वारे आव्हान दिलं जाऊ शकत नाही. राज्यपालांना कल्पना होती निवडणुकीआधी झालेल्या युतीला बहुमत मिळालं होतं : तुषार मेहता (सॉलिसिटर जनरल)
सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तापेचाबाबत सुनावणीला सुरुवात
कोर्टरुम खचाखच भरलं, शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल, राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनु सिंघवी, भाजपचे वकील मुकूल रोहतगी, ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह (महाराष्ट्र सरकार किंवा फडणवीस यांची बाजू मांडणार), सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला, पृथ्वीराज चव्हाण कोर्टात पोहोचले.
महाराष्ट्राच्या सत्तापेचावर अवघ्या क्षणात सुप्रीम कोर्टात सुनावणी; न्यायमूर्ती रमणा, अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांच्या विशेष खंडपीठासमोर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर सुनावणी, दोन्ही बाजूचे वकील कोर्टरुममध्ये पोहोचले
अजित पवारांच्या बंडामागे माझा हात नाही, त्यांच्याशी बोलणं झालं नाही. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचं सरकार येईल : शरद पवार
केंद्रातील सत्ता, राज्यपालपद यांचा गैरवापर करत हवे तसे निर्णय घेतले : शरद पवार
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी संसदीय दलाची बैठक सुरु आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तापेचाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीला अहमद पटेल, केसी वेणुगोपाल, गुलाम नबी आजाद, अधीर रंजन चौधरी, आनंद शर्मा, जयराम रमेश, इत्यादी नेते उपस्थित आहेत.
बहुमत नसतानाही भाजपने सरकार बनवलं. विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी सगळं स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचा या सरकारला पाठिंबा नाही : शरद पवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी 10 वाजता मंत्रालयात पदभार स्वीकारणार
न्यायालयाने आदेश दिल्यास बहुमत सिद्ध करु : भाजप
काँग्रेसचे सर्व आमदार सुरक्षित आणि एकत्रित असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज अजित पवारांची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळात ते अजित पवारांची भेट घेऊन परत येण्यासाठी त्यांची मनधरणी करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज अजित पवारांची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळात ते अजित पवारांची भेट घेऊन परत येण्यासाठी त्यांची मनधरणी करणार आहेत.
महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनला गेले आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे सर्व आमदारांच्या सह्या असलेलं पत्र घेऊन राज्यपालांना भेटणार आहेत.
हम होंगे कामयाब! : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचं ट्वीट
हम होंगे कामयाब! : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचं ट्वीट
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्याला रवाना झाले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या 35व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी शरद पवार साताऱ्याला गेले आहेत. आज सकाळी आपल्या सिल्वर ओक इथल्या निवासस्थानावरुन ते साताऱ्याला निघाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्याला रवाना झाले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या 35व्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी शरद पवार साताऱ्याला गेले आहेत. आज सकाळी आपल्या सिल्वर ओक इथल्या निवासस्थानावरुन ते साताऱ्याला निघाले.
राष्ट्रवादीचे पाच पैकी तीन आमदार, अनिल पाटील, दौलत दरोडा आणि नितीन पवार मुंबईला परतणार आहेत. आता केवळ दोन आमदार संपर्कात नाहीत, एक स्वत: अजित पवार आणि दुसरे अण्णा बनसोडे. या तीन आमदारांना परत आणण्यात एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांनी महत्त्वाची भूमिका निभावली
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर....
1. महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, विश्वासदर्शक ठरावाची तारीख आज निश्चित होण्याची शक्यता
2. अजित पवारांच्या पाठिशी 27 आमदार, भाजपचा दावा, 12 मंत्रिपदासह 15 महामंडळ देण्याची तयारी, सूत्रांची माहिती, वर्षावर जाऊन अजित पवारांची मुख्यमंत्र्यांशी भेट
3. फोडाफोडीच्या शक्यतेने शिवसेना आमदारांची रवानगी लेमन ट्री हॉटेलमध्ये, उद्धव ठाकरेंची ललित हॉटेलमध्ये 6 तास आमदारांशी चर्चा, तर राष्ट्रवादी आमदारांना हयात हॉटेलला हलवलं
4. शिवसेनेचे आमदार गळाला लावण्यासाठी भाजपचं 'ऑपरेशन शिवतेज', तर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 'ऑपरेशन लोटस'; राणे, विखे, पाचपुते आणि नाईकांवर जबाबदारी
5. भाजप आणि राष्ट्रवादी मिळून पुढील स्थिर सरकार देऊ, अजित पवारांचे बंड मागे न घेण्याचे संकेत तर भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही, शरद पवारांचं प्रत्युत्तर
6. टीम इंडियाचा मायदेशातला सलग बारावा कसोटी मालिका विजय, कोलकात्याच्या डे नाईट कसोटीत बांगलादेशावर एक डाव 46 धावांनी विजय