LIVE UPDATES | ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर

Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर....
1. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने भारतीय मुस्लिमांना धोका नाही, पंतप्रधान मोदींकडून मुस्लीम बांधवांना विश्वास, तर काँग्रेससह ममता आणि कम्युनिस्टांवर हल्लाबोल
2. पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं, काँग्रेस नेते राहुल गांधींचं टीकास्त्र, तर द्वेषाला प्रेमानेच उत्तर देण्याचं नागरिकांना ट्विटरवरुन आवाहन
3. झारखंडमध्ये कुणाची सत्ता येणार, 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार, भाजप सत्ता राखणार की काँग्रेस आघाडी विजयी झेंडा रोवणार, याकडे देशाचं लक्ष
4. आधी शॉर्ट सर्किट मग सिलेंडर स्फोट, दिल्लीतील इंदिरा विहारमध्ये घराला भीषण आग, आठ नागरिकांचा होरपळून मृत्यू, पाच जण गंभीर, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
5. कटक वन डे जिंकून टीम इंडियाची मालिकेत 2-1 अशी सरशी, अखेरच्या वन डेत टीम इंडियाची विंडीजवर चार विकेट्सनी मात, विराट कोहली सामनावीर तर रोहित शर्मा मालिकावीर























