LIVE UPDATES | या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला : विरोधी पक्षनेते फडणवीस
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
देशातील आणि राज्यातील बातम्यांना संक्षिप्त आढावा
1. नागरिकत्त्व कायद्याविरोधातल्या हिंसक आंदोलनात यूपीत 6 जणांचा मृत्यू, 50 पोलीस जखमी, ठिकठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक
2. महाराष्ट्रातही मुस्लिम समाज रस्त्यावर, पुणे, औरंगाबाद, भिवंडीत विराट मोर्चे, तर बीड, हिंगोली, परभणीत आंदोलनाला हिंसक वळण, मुख्यमंत्र्यांचं शांततेतं आवाहन
3. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, विरोधक आजही शेतकरी कर्जमाफीचा मुद्द्यावरुन आंदोलन करण्याची शक्यता
4. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना पूर्णपणे क्लीन चिट, एसीबीच्या शपथपत्रावर फडणवीसांचा तीव्र आक्षेप, तर अजितदादांच्या उपमुख्यमंत्रिपदाचे राऊतांकडून संकेत
5. फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी, नारायण राणेंचा हल्लाबोल, राष्ट्रवादी टॅक्स फ्री असल्याचं म्हणत पवारांवर टीकास्त्र
6. झारखंडमध्ये भाजपला दणका तर काँग्रेस आघाडीला फायदा होण्याची शक्यता, एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्व्हे, सोमवारी झारखंड विधानसभेचा निकाल