LIVE UPDATES | निफाडमधील लासलगावात महिलेवर पेट्रोल फेकून जाळण्याचा प्रयत्न
LIVE
Background
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. एल्गारचा तपास एनआयएकडे सोपवण्यावरुन ठाकरे आणि पवारांमधले मतभेद चव्हाट्यावर, केंद्राला तपास सोपवल्यानं पवारांची नाराजी, सीएएलाही दर्शवला विरोध
2. मुख्यमंत्री लवकरच सरप्राईज देतील, औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरासंदर्भात खैरेंचं मोठं विधान, मनसेकडून मुद्दा हायजॅक होत असल्याचं समजताच सेना सरसावली
3. नवी मुंबईत आज भाजपचं दोन दिवसीय अधिवेशन, आमदार , खासदारांसह 10 हजार पदाधिकारी उपस्थित राहणार, नेरुळमध्ये जोरदार तयारी
4. मुंबई, ठाण्यातल्या बांग्लादेशी आणि अफगाणी घुसखोरांचा पर्दाफाश, दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 9 जण ताब्यात, अवघ्या 2 हजारात आधार कार्ड बनवल्याची कबुली
5. अलिबाग रो-रो सेवेसाठी जहाज मुंबई बंदरावर, एक मार्चपासून सेवा होणार सुरू, तर मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इलेक्ट्रिकल बसचा शुभारंभ
6. मासिक पाळी नसल्याचं सिद्ध करण्यासाठी 68 विद्यार्थिनींची तपासणी, चक्क अंतर्वस्त्र काढायला लावली, गुजरातच्या भूजमधल्या घटनेवर देशभरातून संताप