माझ्या मते आज जाहीर झालेले खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरूपाचे : जयंत पाटील

Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. वादळी चर्चेनंतर नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर, मतदानावेळी शिवसेनेचा सभात्याग, चर्चेदरम्यान अमित शाहांचा काँग्रेस, शिवसेनेला टोला
2. पद मिळू नये म्हणून भाजप सोडणार असल्याच्या वावड्या, पंकजा मुंडेंची माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, आज गोपीनाथ गडावरच्या मेळाव्याकडे राज्याचं लक्ष
3. खातेवाटपावरुन महाविकास आघाडीत गोंधळ, सूत्रांची माहिती, काँग्रेसचा सरकारला बाहेरुन पाठिंबा देण्याचा इशारा, बांधकाम, नगरविकास आणि जलसंधारणावरुन घोडं अडलं
4. अटल बिहारी वाजपेयींऐवजी समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचं नाव देणार, मंत्रिमंडळ बैठकीत सहमती, 3 हजार 500 कोटींची निधी मंजूर
5. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस, मुंबईत वाय. बी सेंटरवर पवार शुभेच्छांचा स्वीकार करणार
6. टीम इंडियाने वानखेडेवरच्या शेवटच्या टी ट्वेन्टीसह मालिकाही घातली खिशात, भारताकडून विंडीजचा 67 धावांनी धुव्वा, कर्णधार विराट कोहली मालिकावीर























