LIVE UPDATES | पुणे, मुंबईनंतर नागपूरमध्ये एका रूग्णाला कोरोनाची लागण; राज्यभरात एकूण 11 कोरोनाग्रस्त

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Mar 2020 12:06 AM
पुण्यातल्या नायडू रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या वॉर्डमध्ये डॉक्टरच फिरकत नसल्याची खंत, खुद्द रुग्णांनीच व्यक्त केलीय. अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं कोरोनाग्रस्तांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधीशी फोनवरुन बोलताना म्हटलंय.
भिवंडीत कोरोनाच संशयित रुग्ण आढळून आलेल्या खळबळ उडाली होती. या रुग्णाचा रिपोर्ट मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात चाचणी करता पाठविण्यात आला होता. या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे
सातारा जिल्ह्यात एकही कोरोनाची लागण झालेला रुग्ण नाही ; अफवावर विश्वास ठेवू नका, अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करणार, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचना
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर युजीसीने सर्व विद्यापीठांना खबरदारी म्हणून सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सर्व परिसंवाद, कार्यशाळा आणि व्याख्यान रद्द करण्यात आले आहेत.

सध्या विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात सूचना नाहीत.
राज्यात सरकार पाडण्याचा प्रयत्न होतो आहे, असे ऐकले. पण शिमगा नुकताच संपला आहे, त्यामुळे अजुन कुठला मुहूर्त विरोधकांना शिल्लक राहिलेला नाही, असं मला वाटतं, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. जी स्थिती मध्य प्रदेशमध्ये उद्भवली तसे महाराष्ट्रात काहीही होणार नाही. मला महाराष्ट्राची माहिती आहे. महाराष्ट्रात पाच वर्षे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार टिकणार याबाबत मला शंका नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तम रीतीने आणि सर्वांना सोबत घेऊन काम करत आहेत, असं ते म्हणाले. आज विधान भवन येथे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विधिमंडळ वार्ताहर कक्षात ते बोलत होते.
कोरोनाचा एकही संशयित रुग्ण धुळे जिल्ह्यात नसल्याची माहिती धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी दिलीय. शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत कोरोना संदर्भात प्रशासनानं खबरदारीचे उपाय केले आहेत. दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात देखील विशेष कक्ष स्थापन करण्यात आलाय. कोरोना संदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम जिल्ह्यात सुरु आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे मार्च दरम्यान होणाऱ्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिलीय .
सीएए,एनपीआर,एनआरसी विरोधात परभणी महापालिकेत घेणार ठराव, एनपीआरसाठी एक जणही कागदपत्र देणार नाही, शहरातील धर्मगुरू,महापालिका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून पुणे, मुंबईनंतर नागपुरमध्येही एका रूग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे.
कोरोनामुळे शिवसेनेकडूनही काही शिवजयंतीचे कार्यक्रम रद्द ,

कोरोनामुळे शिवराय संचलन कार्यक्रम रद्द
,
उद्याच्या एअरपोर्टचा शिवजयंतीचा कार्यक्रमही रद्द होण्याची शक्यता

रंगपंचमीला अभयारण्यात जेवणावळी कराल तर कारवाई, जंगलांना आगी लागण्याच्या प्रकारामुळे वन विभाग आणि पोलीस प्रशासनाची विशेष मोहीम, राधानगरी, काळाम्मावाडी, दाजीपूर अभयारण्य परिसरात होणार कारवाई, हुल्लडबाजांवर वन्यजीव कायद्यांतर्गत होणार कारवाई, गावकरी, पोलीस आणि वन विभागाला करणार मदत
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे.
पुण्यात कोरोनाचे एकूण 8 रूग्ण

पुणे - पुणे शहरामध्ये कोरोनाचे एकूण 8 रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक तसेच दुबईला ट्रीपला गेलेला यवतमाळचा रहिवासी व सध्या पुण्याला असलेला या तिघांची तपासणी करण्यात आली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याव्यतिरिक्त ट्रीपला गेलेल्यांपैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या8 वर गेली आहे. या रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
कोरोनाच्या संकटाशी दोन हात करायला राज्यभरातील गणेश मंडळं पुढं सरसावली, मुंबईसह राज्यभरातील सुमारे 12 हजार गणेश मंडळांची फौज त्यांच्या विभागात करणार कोरोनापासून बचावासाठी जनजागृती करणार, पत्रकं वाटप किंवा कॅम्पेन घेऊन कोरोनाचे do's आणि don't तळगळातील लोकांपर्यंत पोहचवणार, बृहनमुंबई सार्वजनिक गणेश उत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर यांचे पत्रकाद्वारे सर्व गणेश मंडळांना आवाहन
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणखी एका कोरोना संशयित रुग्णला दाखल केले आहे. आज दिवसभरात तिघांना कोरोना वॉर्डमध्ये दाखल केले असून उपचार सुरू आहेत. या तिघांचे रिपोर्ट उद्या मिळणार आहेत.
कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळणार, अंतिम आठवडा प्रस्ताव शनिवार येणार, शनिवारी अधिवेशनाचा समारोप होणार, बैठकीत निर्णय
भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीकडून राज्यसभेची पहिली यादी जाहीर, महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि उदयनराजे भोसलेंच्या नावांवर शिक्कामोर्तब तिसरं नाव अजूनही गुलदस्त्यात, एकनाथ खडसेंसाठी राज्यातील नेते आग्रही असल्याची चंद्रकांत पाटलांची माहिती
मुंबईत दोन जणांना कोरोनाची लागण, सरकारसमोर मोठं आव्हान
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्य परिसरात भीषण आग लागली आहे. शेकडो एकर परिसरात आग पसरली आहे. जंगलाला लागलेल्या वणव्यात वृक्षसंपदेचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.
कोरोना संशयित रुग्णाना उपचार करण्यासाठी केंद्राला सोलापुरात विरोध करण्यात येतोय. कोरोना संशयित रुग्ण असतील तर त्यांच्यावर तात्काळ उपचार व्हावेत तसेच इतर रुग्णांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी आरोग्य प्रशासनातर्फे स्वंतत्र केंद्र उभारण्यात येतंय. सोलापुर जिल्ह्यातील 9 ठिकाणी हे केंद्र उभे करण्यात येणार आहे. तर सोलापुर शहरातील शासकीय रुग्णालय तसेच वाडिया हॉस्पीटलमध्ये हे केंद्र उभं केलं जाणार आहे. मात्र वाडिया हॉस्पीटल हे शहराच्या मध्यभागी असून आसपासच्या परिसरात लोकवस्ती आहे. कोरोनाचे रुग्णांवर जर वस्तीच्या आसपास उपचार केले गेले तर आम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शहराच्या बाहेर एखादे केंद्र उभे करावे. जर प्रशासनाने वाडिया हॉस्पीटलमध्ये केंद्र उभं केल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय. वाडिया हॉस्पीटल हे गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे हॉस्पीटलची तात्पुरती डागडुजी करण्यात येत आहे. मात्र हॉस्पीटलची सफाई करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा तोंडावर साधं मास्क देखील नाहीये. महापालिका प्रशासनातर्फे मास्क पुरवण्यात आलेले नाहीत अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र कारवाईच्या भितीपोटी या कर्मचाऱ्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. त्यामुळे लोकांच्या जीवाची काळजी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाची काळजी कोण करणार हा ही मोठा प्रश्न आहे.
सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळण्याचे संकेत. सत्र न्यायालयाच्या आदेशांना स्थगिती देऊन प्रकरण पुन्हा जातपडताळणी समितीकडे पाठवण्याची शक्यता, पाच ते सहा महिन्यांत निकाल देणं बंधनकारक करण्याची शक्यता. एका पक्षकाराचे वकील गैरहजर असल्यानं गुरूवारी हायकोर्ट सुनावणार फैसला.
ज्योतिरादित्य शिंदे भाजप मुख्यालयात दाखल, थोड्यात वेळात भाजपमध्ये प्रवेश करणार, 13 मार्चला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरणार
राज्यसभेचा अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार विधानभवनात दाखल, चौथ्या जागेसाठी महाआघाडीत तिढा कायम, फौजिया खान यांच्या उमेदवारीवर अद्याप प्रश्नचिन्ह, चौथ्या जागेसाठी शिवसेनेचा राष्ट्रवादीला पाठिंबा तर काँग्रेसही आग्रही
कोल्हापूर | राधानगरी अभयारण्य परिसरात भीषण आग, शेकडो एकर परिसरात पसरली आग, जंगलाला लागलेल्या वणव्यात वृक्षसंपदेचे मोठे नुकसान
पिंपरी चिंचवडमधील कोरोना संशयित महिलेचे रिपोर्ट्स निगेटिव्ह, खबरदारी म्हणून चार दिवस घराबाहेर न पडण्याच्या कुटुंबाला सूचना
कोरोनासंदर्भात कोल्हापूर जिल्ह्यात सतर्कता बाळगण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात नियोजन केलं आहे. जिल्ह्यात प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. हे कर्मचारी बस स्टॉप, रिक्षा स्टॅण्ड, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना सूचना देतील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत आज बैठक घेणार, दुपारी 1 वाजता कोरोना संदर्भात उपाययोजनांचा आढावा घेणार
पिंपरी चिंचवडमधील कोरोना संशयित महिलेचे रिपोर्ट्स निगेटिव्ह, खबरदारी म्हणून चार दिवस घराबाहेर न पडण्याच्या कुटुंबाला सूचना
कोरोनाच्या भीतीने विधीमंडळात अनावश्यक प्रवेश बंदी करण्यात आली आहे. विधीमंडळात आज एका दिवसाच्या पासेसवर बंदीचे निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभा अध्यक्ष, सभापती किंवा मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही पासेसचे वाटप न करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
कोरोना संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यात सतर्कता, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात नियोजन, जिल्ह्यात प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी सरकारी कर्मचारी असणार, बस स्टॉप, रिक्षा स्टॉप, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना सूचना देणार
कोरोना बाधित असलेल्या दाम्पत्याच्या ड्रायव्हरने आरटीओमध्ये भेट दिली होती. ड्रायव्हर सोबत संपर्कात आलेल्या तीन क्लार्कला तपासणीसाठी नायडू रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.
सांगलीतील जत तालुक्यात उमदी येथे तिहेरी हत्याकांड, मुलाकडून आई, वडील आणि बहिणीचा निर्घृण हत्या, उमदी पोलीस घटनास्थळी दाखल, हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना संशयित महिला आढळली, महिला 27 फेब्रुवारीला दुबईतून भारतात परतली होती, खबरदारी म्हणून महिलेसह कुटुंबातील आठ व्यक्ती नायडू रुग्णालयात दाखल
मुंबईत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
कोरोनाबाबत जनजागृती करण्याचं काम हाती, आयपीएल बाबत आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रयत्न सुरु, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यावसायिकांवर मोठे संकट कोसळले आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज दुपारी दोन वाजता विधानभवनात अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेश टोपे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत महाराष्ट्र चिकन असोसिएशनची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर चारच्या सुमारास आसोसिएशनचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेणार आहेत.
शासकीय मेगाभरतीची तारीख निश्चित झाली आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत खाजगी एजन्सी नियुक्त करुन 20 एप्रिलपासून मेगाभरतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. थेट जनतेशी संबंधित गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन, महसूल व वने, महिला व बालविकास या विभागांमध्ये सर्वाधिक रिक्त पदे आहेत. राज्यातील शासकीय विभागांमधील रिक्त पदांची संख्या आता दोन लाखांवर पोहोचली आहे. माहितीच्या अधिकारात संकलित झालेली माहिती एबीपी माझाला सर्वात आधी प्रसारित केली. त्यानंतर प्रशासनामध्ये हालचाली सुरु झाल्या.
वाळू माफियांच्या डम्पर तहसीलदारांच्या गाडीला जोरदार धडक देऊन गाडीवर वाळू रिचवण्याचा प्रयत्न केल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. मंठा तालुक्यातील तळणीजवळ असलेल्या पूर्णा पात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरु असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार मंठ्याच्या तहसीलदार सुमन मोरे या पथकासमवेत रात्री दहाच्या सुमारास वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी निघाल्या. त्याचदरम्यान टाकळखोपा ते शिरपूर या पाणंद रस्त्यावर टेम्पोचा पाठलाग करत असताना वाळू माफियांच्या डम्परने तहसीदारांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत तहसीदारांच्या गाडीचं नुकसान आलं असून टेम्पो पसार झाला आहे. त्याचबरोबर तहसीदरांच्या गाडीवर वाळू रिचवण्याचाही प्रयत्न या डम्पर चालकाने केला. दरम्यान गाडीत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रीत केली आहे. आता मंठा पोलिसांत याबाबत तक्रार दाखल झाली असून पोलीस डम्पर चालकाचा शोध घेत आहेत.
मनसेने जाहीर केलेल्या शॅडो कॅबिनेटची शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून खिल्ली उडवण्यात आली. शॅडो कॅबिनेटमध्ये आमदार निवडून आणावे लागतात, असं सामनात म्हटलं आहे. यानंतर आता मनसेनेही या टीकेला उत्तर दिलं आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली. अख्खा अग्रलेख 'सावली'वर खर्च केल्याबद्दल 'शॅडो' संपादकांचे आभार. हा खेळ सावल्यांचा आत्ता कुठे सुरु झालाय. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात 'मोठी तिची सावली' हा अग्रलेख लिहायला लागू नये असं काम महाखिचडीने करावं या सदिच्छा.

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील काही शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, यात कात्रज, नांदेड सिटी आणि धायरी भागातील शाळांचा समावेश, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दिले नसताना खबरदारी म्हणून शाळा प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
आई-वडिलांच्या भांडणात नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू, आई-वडिलांचं भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मुलीच्याच डोक्यात वडिलांनी घातला लोखंडी रॉड, हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील सवना येथील घटना
साडे चारशे वर्षात पहिल्यांदाच पैठणचा नाथषष्ठी सोहळा रद्द, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय, अंबाबाईच्या दारावर निर्जंतुकीकरण यंत्रणा, इगतपुरीतली शिबिरं रद्द
राहुल ब्रिगेडमधले महत्त्वाचे नेते समजले जाणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सदस्यत्त्वाचा राजीनामा दिलाय. लवकरच ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे.. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह २२ आमदारांनी काल राज्यपालांना राजीनामे पाठवले आहेत. त्यात ६ मंत्री आणि १६ आमदारांचा समावेश आहे. तर तिकडे मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही राज्यपालांना पत्र लिहून मंत्र्यांना हटवण्याची शिफारस केली आहे. दरम्यान, शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर जोरदार टीका केलीय.
महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या पाचवर पोहचली आहे. कारण कोरोना झालेल्या दाम्पत्याला जो टॅक्सी ड्रायव्हर मुंबईहून पुण्याला घेऊन आला होता, त्याला देखील कोरोना झाल्याचं उघड झालंय. तर पुण्यातल्या दाम्पत्याच्या मुलीला आणि त्यांच्यासोबतच्या विमानातल्या एका सहप्रवाशाला कोरोनाची लागण झालीय. हा सहप्रवासी यवतमाळचा असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. या पाचही जणांवर पुण्यातल्या नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर कोरोनाग्रस्त दाम्पत्य असलेल्या विमानातील बीडच्या अन्य तिघांवरही आरोग्य विभागाची नजर आहे.

पार्श्वभूमी

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा  www.abpmajha.in

राज्यातील आणि देशभरातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा




    1. महाराष्ट्रात आतापर्यंत 5 कोरोनाग्रस्त, पुण्यातल्या दाम्पत्याच्या मुलीसह विमानातल्या सहप्रवाशाला लागण, मुंबई ते पुणे प्रवास करणाऱा टॅक्सीचालकही कोरोनाग्रस्त

    2. कोरोनासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, आयपीएलसह, अधिवेशन कामकाजाबाबत निर्णय होण्याची शक्यता

    3. साडे चारशे वर्षात पहिल्यांदाच पैठणचा नाथषष्ठी सोहळा रद्द, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय, अंबाबाईच्या दारावर निर्जंतुकीकरण यंत्रणा, इगतपुरीतली शिबिरं रद्द

    4. ज्योतिरादित्यांसह मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या 22 आमदारांचा राजीनामा, कमलनाथांची खुर्ची धोक्यात, उर्वरीत आमदारांना आज काँग्रेस भोपाळमधून जयपूरला हलवणार

    5. ल्लीतल्या दंगलीवर लोकसभेत आज चर्चा, गृहमंत्री अमित शाह चर्चेला उत्तर देणार, विरोधी पक्षांकडून केली होती चर्चेची मागणी

    6. मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर सामनातून टीका, मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी शॅडो राज्यपाल नेमण्याचाही खोचक सल्ला


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.