LIVE UPDATES | पुण्यात कोरोनाचे दोन रूग्ण पॉझिटिव्ह
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
राज्यातील आणि देशभरातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. येस बँक गैरव्यवहारप्रकरणी राणा कपूर यांना तीन दिवसांची कोठडी, तर देश सोडणाऱ्या मुलीला मुंबई विमानतळावर रोखलं, येस बँकेमुळे सरकारच्या कर्जमाफी योजनेला फटका
2. आज मनसेचा 14 वा वर्धापन दिन, मनसेच्या शॅडो कॅबिनेटची यादी माझाच्या हाती, राज ठाकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
3. राज्यातील सरकारी खात्यात 2 लाख 193 पदं रिक्त असल्याची माहिती, गृह, जलसंपदा, कृषी, महसूल विभागात सर्वाधिक पदं रिक्त असल्याचं माहितीच्या अधिकारात समोर
4. राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, भिवंडीत परदेशी मास्क धुवून विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल
5. पुण्यात कात्रजच्या बोगद्याजवळ वणवा, अनेक झाडं जळून खाक, वृक्षप्रेमी सयाजी शिंदेंकडून झाडं वाचवण्याचे प्रयत्न
6. भारतीय महिलांचं पहिल्यावहिल्या विश्वचषकाचं स्वप्न पुन्हा अधुरं; ऑस्ट्रेलियानं भारताला हरवून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकावर कोरलं आपलं नाव