7th December Headline : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, दिल्ली एमसीडीचा निकाल
Todays 7 December Top Headline : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदी हे सकाळी 10 वाजता माध्यमांशी संवाद साधतील. सं
Todays 7 December Top Headline : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. अधिवेशनाआधी पंतप्रधान मोदी हे सकाळी 10 वाजता माध्यमांशी संवाद साधतील. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र कर्नाटक वादाचे पडसाद उमटणार असून शिवसेना ठाकरे गट या प्रश्नावर सभागृहात आवाज उठवणार आहे. तर दुसरीकडे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्याच्या तयारीत आहे.
मुंबई- राष्ट्रवादीतर्फे पवईमध्ये कर्नाटक बँकेसमोर आंदोलन
राष्ट्रवादीतर्फे पवईमध्ये कर्नाटक बँकेसमोर सकाळी 11 वाजता आंदोलन केले जाणार आहे. कर्नाटकनं हे हल्ले ताबडतोब थांबवावेत. सरकरनं 48 तासांत परिस्थिती नियंत्रणात आणावी अन्यथा वेगळी भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शरद पवारांनी दिला आहे.
आज दिल्ली एमसीडीचा निकाल
आज दिल्ली महापालिकेचा निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. भाजपनं तब्बल 7 मुख्यमंत्री, 17 कॅबिनेटमंत्री या निवडणुकीच्या प्रचारासाठी लावले होते. मात्र एक्झिट पोलनुसार आप या निवडणुकीत भाजपचा पराभव करेल असं दिसतंय. दिल्लीत 250 वॉर्डसाठी 1349 उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे. निकालानंतर दुपारी 3 वाजता अरविंद केजरीवालांचं भाषण होणार आहे.
आज दत्तजयंती
दत्तजयंती निमित्त भद्रावतीच्या दत्तमंदिर येथे दत्तजन्म सोहळा साजरा करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता हा सोहळा होणार असून या वेळी 81 जोडप्यांच्या हस्ते महाआरती करण्यात येईल.
नाशिक - दत्त जयंती निमित्ताने नाशिकच्या प्रसिद्ध एकमुखी दत्त मंदिरात भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत.
शिर्डी- शिर्डीत दत्त जयंती महोत्सव साजरा होतो. दत्त मंदिरात दत्त जन्माचे स्वागत करण्यात येते. अनेक पायी पालख्या देखील दत्त जयंतीला पोहचतात. नेवासा श्री क्षेत्र देवगड येथेही मोठा दत्तजयंती उत्सव होतो. दैदीप्यमान सोहळा साजरा होतो. लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होतात.
नांदेड : नागरिकांची आज संवाद यात्रा निघणार
जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांची आज संवाद यात्रा निघणार आहे. देगलूर तालुक्यातील जागतिक वारसा असणारे ऐतिहासिक होट्टल (हेमाडपंथी मंदिर), बिलोली, धर्माबाद, उमरी ते संगमपर्यंत संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलंय. देगलूर येथील होट्टल मधून सकाळी 9 वाजता संवाद यात्रा निघणार आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी या कृति समितीकडून संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलंय. सीमावर्ती भागातील 150 खेड्यातील नागरिकांशी संवाद साधत जाणार ही यात्रा निघेल.
राज्यापलांबाबात पुढील भूमिका ठरवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटनांची बैठक
पुणे - राज्यापलांबाबात पुढील भूमिका काय घ्यायची हे ठरवण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटनांची बैठक. शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ, दुपारी 2.30 वाजता
राज्यपालांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना जिल्हा बंदचं आवाहन
जालना- राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच भाजप नेत्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं असून यामध्ये महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी पाठिंबा दिलाय. सकाळपासून शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवण्याचा आवाहन व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना करण्यात आलंय.