पिंपरी चिंचवड : मध्यप्रदेशमधील दरोडेखोरांसोबत पिंपरीचिंचवड (Pimpari Chinchwad Police) पोलिसांची झटापट झाली आहे. यानंतर आठ आरोपींना पोलिसांनी बेड्या ही ठोकल्यात पण आणखी तीन आरोपींचा शोध सुरु आहे. यात एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर हा थरार सकाळी काल साडे अकराच्या सुमारास घडला. मध्यप्रदेशची ही टोळी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरून जाणार असल्याची खात्रीलायक माहिती पिंपरीचिंचवड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी उर्से टोल नाक्यावर सापळा रचला होता.


मुंबई वरून पुण्याला सकाळी साडेअकराच्या सुमारास दोन संशयित वाहन टोलनाक्यावर आली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली. मात्र, तरी देखील पोलिसांनी मार्गावरून हटले नाहीत. शेवटी पोलिसांच्या अंगावर त्यांनी वाहन घातलं आणि गाडीतून उतरत ते डोंगरात पसार झाले.


तत्पूर्वी आठ आरोपींना पोलिसांनी जागेवर अटक केली तर चौघे डोंगराळ परिसरात लपून बसले. यात एक पोलीस जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील सर्व पथके घटनास्थळी दाखल झाले असून अन्य आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्वाच्या बातम्या


Pimpari Chinchwad :मध्य प्रदेशमधील दरोडेखोरांसोबत पिंपरी- चिंचवड पोलिसांची झटापट,एक पोलीस गंभीर जखमी