Pimpari Chinchwad :मध्य प्रदेशमधील दरोडेखोरांसोबत पिंपरी- चिंचवड पोलिसांची झटापट,एक पोलीस गंभीर जखमी

Continues below advertisement

मध्य प्रदेशमधील दरोडेखोरांसोबत पिंपरी- चिंचवड पोलिसांची झटापट झालीये. पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर हा थरार सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना गजाआड केलंय. तर तीन आरोपींचा अजूनही शोध सुरु आहे. या घटनेत एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे. मध्य प्रदेशातली दरोडेखोरांची टोळी पुणे मुंबई एक्स्प्रेसवेवरुन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी उर्से टोल नाक्यावर सापळा रचला होता. मुंबई वरून पुण्याला सकाळी साडेअकराच्या सुमारास दोन संशयित वाहन टोलनाक्यावर आली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी थेट पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली होती.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram