एक्स्प्लोर
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार?
नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध म्हणून उटण्याऐवजी माती लावून अभ्यंग स्नान केलं.
मुंबई : सलग तिसऱ्या दिवशीही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. आता एसटीच्या संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे.
काही वेळापूर्वी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि संपाबाबत माहिती दिली. त्यामुळे आता मुख्यमंत्री मध्यस्थी करणार की हातावर हात ठेवून गप्प बसणार हे पाहणं महत्वाचं आहे.
धुळ्यात एसटी कर्मचारी आक्रमक
धुळे शहरामध्ये एसटी कर्मचारी आक्रमक झाले. आणि त्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावतेंच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन केलंय. आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कोल्हापुरात अर्धनग्न आंदोलन
कोल्हापुरातही एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाकर रावतेंचं पोस्टर फाडलं. रावतेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलनही करण्यात आलं. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली.
नाशिकमध्ये उटण्याऐवजी माती लावून अभ्यंग स्नान
नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध म्हणून उटण्याऐवजी माती लावून अभ्यंग स्नान केलं. हा संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनानं राज्यभर विश्रामगृहाचं पाणी, शौचालय, स्वच्छतागृह आणि वीज बंद केली आहे. जे कर्मचाऱी आहेत. त्यांना विश्रामग्रहातून बाहेर काढलं जातंय. त्याचा निषेध म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी हे अनोखं आंदोलन केलं. तर दुसरीकडे एसटीच्या संपामुळं नाशिक आगारात अडकून पडलेल्या चालक आणि वाहकांसाठी दिवाळीच्या फराळाचं वाटप करण्यात आलं. बसस्थानकावर चिवडा फराळ खात या एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी केली.
एसटी कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जातेय : इंटक
राज्यातील विविध आगरातून कर्मचाऱ्यांना हकलवून दिलं जातंय, दमदाटी केली जातेय. सर्क्युलर काढून होमगार्ड्सची भरती करून एसटी काढल्या जात आहेत. कालच्या प्रस्तावानुसार आम्हाला 4 ते 5 हजार वेतन वाढ मिळेल, 12 ते 13 हजार रुपये पगारात आमच्या मूलभूत गरजा भागणार नाहीत. इतर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे हीच आग्रहाची विनंती आहे. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे, चर्चेसाठी बोलावलं तर आम्ही तयार आहोत, असं ‘इंटक’चे सरचिटणीस मुकेश तिगोटे म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :
- एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
- पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी
- जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी
- राज्यात एसटीची कर्मचारी संख्या 1 लाख 2 हजार असून, एसटी बसची संख्या 17 हजार आहे.
- दररोज 70 लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात.
- एसटीच्या आगारांची संख्या 258, विभागीय कार्यालयांची संख्या 31 आहे.
ब्लॉग : लालराणीचा राजा उपाशी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement