एक्स्प्लोर

चोरीच्या ट्रकची विक्री, औरंगाबादच्या एमआयएम नगरसेवकाला अटक

ट्रक आणि डम्पर चोरी करुन ते बनावट कागदपत्रांच्या आधारे नव्या ग्राहकांना विक्री करणाऱ्या टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात पर्दाफाश केला आहे.

ठाणे : चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याप्रकरणी औरंगाबाद महापालिकेतील एमआयएम नगरसेवक शेख जफर शेख अख्तरला भिवंडी गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. ट्रक आणि डम्पर चोरी करुन ते बनावट कागदपत्रांच्या आधारे नव्या ग्राहकांना विक्री करणाऱ्या टोळीचा भिवंडी गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात पर्दाफाश केला आहे. आरोपींकडून 50 ते 100 ट्रक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे एसीपी मुकुंद हातोटे यांनी दिली. अनेक ग्राहकांची फसवणूक नारपोली पोलीस स्टेशन येथे दाखल ट्रक चोरीच्या गुन्ह्याचा तपास भिवंडी गुन्हे शाखेकडे आहे. सुरुवातीला बुलडाणा येथे चोरीच्या ट्रक, डम्पर यांचे नव्याने रजिस्ट्रेशन करुन ते विक्री केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बुलडाणा येथून पाच ट्रक जप्त करुन या गुन्ह्याचा सखोल तपास सुरु करण्यात आला. तपास सुरु केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसोबत गुजरातमधील चोरीला गेलेले असंख्य ट्रक आणि डम्पर हे नव्या बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करुन ते महाराष्ट्रातील विविध भागात विक्री केल्याचं समोर आलं. आतापर्यंत आरटीओ कारकुनासह 13 जण ताब्यात भिवंडी गुन्हे शाखेने तब्बल बारा जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 22 ट्रक जप्त केले. या गुन्ह्यात आता राजकीय प्रस्थापित व्यक्तीही असल्याचं नगरसेवक शेख जफर शेख अख्तर याच्या अटकेने स्पष्ट झालं. आता अटक झालेल्यांची संख्या 13 झाली असून त्यामध्ये नागपूर येथील एक आरटीओ कारकून आणि एका महिलेचाही समावेश आहे. रॅकेट कसं समोर आलं? भिवंडी गुन्हे शाखेकडून एक चोरीची बाईक ताब्यात घेण्यात आली होती. या बाईकच्या डिक्कीत ट्रकची कागदपत्रे आढळून आली, जी नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयातील होती. त्यामुळे तिथे संबंधित कागदपत्रांची खातरजमा केली असता ती बनावट असल्याचं निष्पन्न झालं. गुन्हे शाखेने नारपोली पोलीस स्टेशन येथे ट्रक चोरी संदर्भात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. या रॅकेटची पाळेमुळे बुलडाणा, नागपूरपर्यंत पसरली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नागपूर ग्रामीण आरटीओ येथून बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी झालेल्या पाच ट्रकची माहिती मिळवली आणि तेथील दोन आरटीओ एजंटना ताब्यात घेतलं. पुढे तपासात नागपूर आरटीओ येथील कारकुनालाही ताब्यात घेतलं. या टोळीने ट्रक आणि डम्परचे मूळ चेसीस नंबर आणि इंजिन नंबर नष्ट केले. बनावट नंबर टाकून त्यांची रंगरंगोटी केली आणि औरंगाबादचा एमआयएम नगरसेवक आणि त्याचा भाऊ या गाड्यांची विक्री करत होता, अशी माहिती समोर आली. या ट्रक आणि डम्परची ग्राहकांना फसवून विक्री केली जात होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषदSaif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Embed widget