Nagpur Winter : तापमानात होणार आता चढउतार; रात्रीचा पारा घसरला
मध्यवर्ती नागपूर शहरात उन्हाळ्यात अत्याधिक तापमान असते तर पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि हिवाळ्यात गारठणारी कडक थंडी असते. विशेषत: डिसेंबर महिन्यातील नागपूरची थंडी रेकार्ड ब्रेक असते.
Nagpur News : यंदा अपेक्षेपेक्षा सर्वाधिक पाऊस (Extra Rain) झाल्याने थंडीचा प्रभाव अधिक राहणार आहे. दिवाळीनंतर काही प्रमाणात थंडीने (Winter) आपली चाहूल दिली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत थंडीची लाट (cold wave) राहिल. मध्यवर्ती नागपूर शहरात उन्हाळ्यात अत्याधिक तापमान असते तर पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि हिवाळ्यात गारठणारी कडक थंडी असते. विशेषत: डिसेंबर महिन्यातील नागपूरची थंडी रेकार्ड ब्रेक असते.
2 महिने कडक थंडीचे
मागील पाच सहा दिवसांपासून नागपूर (Nagpur) शहरात गारवा वाढल्याने रात्रीच्या वेळी जॅकेट घालून फिरणारे वाढले आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी सुरु झाल्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी हे दोन महिने कडक थंडीचे राहणार आहे. दरम्यान, पाऊस निघून गेल्यानंतर आकाश स्वच्छ आणि निरभ्र झाल्याने थंडी जाणवायला लागली आहे. विदर्भात (Vidarbha) सर्वत्र दिवसाचे कमाल तापमान स्थिर असले, तरी रात्रीचे तापमान तीव्रतेने घटत आहे.
थंडीची चाहूल
सध्या तापमान सरासरीपेक्षा थोडेसे कमीच आहे. त्यामुळे संध्याकाळी आणि सकाळी आल्हाददायक अशी थंडी जाणवू लागली आहे. मात्र हवामान विभागाने 2 नोव्हेंबरपर्यंत नागपूरच्या तापमानात चढउतार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या काळात तापमान हे सरासरीपेक्षा कमी ते सरासरीपेक्षा अधिक राहू शकते. त्यामुळे कधी थंडीची चाहूल तर कधी ऑक्टोबर हीट जाणवू शकते. सध्याही सकाळी थंडावा, दुपारी चांगले ऊन आणि संध्याकाळी परत थंडावा असे वातावरण आहे. यामुळे शहरात परत एकदा सर्दी, खोकला आणि तापाची साथ सुरु झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या नोंदीनुसार रविवारी शहरात 18 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
महत्त्वाची बातमी