एक्स्प्लोर
नागपूर पालिकेच्या बसच्या रंगावरुन राजकारण तापलं
नागपूर शहरातल्या बसेस सध्या भगव्या आणि हिरव्या रंगानं रंगवण्यात आल्या आहेत. पण हा रंग ऑरेन्ज सिटीचा आहे की भाजपचा असा सवाल विरोधक विचारत आहेत.
नागपूर : ऑरेन्ज सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरातल्या बसेस सध्या भगव्या आणि हिरव्या रंगानं रंगवण्यात आल्या आहेत. पण हा रंग ऑरेन्ज सिटीचा आहे की भाजपचा असा सवाल विरोधक विचारत आहेत.
नागपूर शहरातील बस सेवा महापालिकेतर्फे संचालित केली जाते. सध्याच्या 3 ऑपरेटर्सच्या माध्यमातून शहरात सुमारे 300 बसेस सुरु आहेत. आतापर्यंत यातील जास्तीत जास्त बसेस ह्या लाल रंगाच्या होत्या.
पण प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसेसच्या संख्येत अजून वाढ करणे जरुरी आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात 75 नवीन बसेसच्या खरेदीला मंजुरी दिली होती. त्यानुसार नवीन बसेस येत्या काळात दाखल होणार आहेत. मात्र, या नव्या बसेस सेवेत दाखल होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. कारण या बसेसना भगावा आणि हिरवा रंग देण्यात आलेला आहे.
बसच्या रंगावरुन विरोधकांनी अक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केल्याने, भाजपकडून त्यावर सारवासारव होत आहे. बसचा हा रंग भाजपच्या झेंड्याचा नसून, ऑरेन्ज व ग्रीन सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या रंग असल्याचा दावा परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी केला आहे.
दरम्यान, राजकीय दृष्ट्या नागपूर शहर भाजपमय आहेच. जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार भाजपचे आणि त्यात नागपूरचे आमदार हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. शिवाय, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतही भाजपचंच वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपमय असलेल्या शहरात भगव्या आणि हिरव्या रंगाच्या बसेस कशासाठी हा प्रश्न विचारला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement