नाशिक : या देशाचा मूळ मालक म्हणजे आदिवासी. त्याची अवस्था बिकट झालीय, ती बदलण्याची गरज आहे असं राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं. इगतपुरी तालुक्यातील सोनोशी गावात क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या स्मरणार्थ 'सन्मान बाडगीच्या माचीचा' हा कार्यक्रम आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. आदिवासी बांधव सध्या संकटात असून पवार साहेबांनी आमचे नेतृत्व करावे अशी हाक यावेळी अदिवासींकडून देण्यात आली. 


संपूर्ण आदिवासी उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाल्याचं शरद पवार यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवत लवकरच मी चंद्रपूरला जाऊन  तिथल्या तरुणांशी संवाद साधणार असल्याचही म्हंटलय. शरद पवार म्हणाले की, "बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आपण आठवणींचे स्मरण करतोय, आदिवासींचा आज आपण सन्मान करतोय. पण त्यांचं राजकारणात लक्ष नाही, सामाजिक परिवर्तनाचा संघर्ष ते करत आहेत. आदिवासी हे जगाचे मालक, हे वाक्य काही माझं नाही तर देशाचे सर्वोच्च न्यायाधीश यांचे आहे." 


शरद पवार म्हमाले की, "जंगल संस्कृतीचे रक्षण करण्याचे काम आदिवासी करतोय. वनसंपत्ती जतन करण्याची कामगिरी आदिवासी यांनी केलं आहे. अत्याचार होत असेल तर वेळप्रसंगी संघर्ष करावा लागेल. संघर्ष म्हणजे नक्षलवाद नव्हे. अन्यायाच्या विरोधात लढतो तो आदिवासी."


शिवाजी महाराजांचे राज्य हे भोसल्यांचं राज्य असं कुणी म्हंटल नाही तर रयतेचं राज्य अशी त्याची ओळख होती असं शरद पवार म्हणाले. ते म्हणाले की, "हिंदवी स्वराज्याचे राज्य असं म्हंटल जात त्या मागची भावना समजून घेतली पाहिजे. भीमा कोरेगावला ऐतिहासिक घटना घडली पण त्याचा देशात वाद झाला. पण तिथे लढणारा व्यक्ती आदिवासी होता. बिरसा यांचा वारसा जपला पाहिजे, आदिवासी संस्कृती जपली पाहिजे. सत्याची कास धरून जिथं अन्याय अत्याचार होतो तिथं जागृती निर्माण करून उत्तम प्रशासन आणि स्वाभिमान ठेवणे हे केलं पाहिजे."


महत्त्वाच्या बातम्या :