गडचिरोली : छत्तीसगडमधील शरणागती पत्करणाऱ्या एका नक्षलवाद्याने माहिती दिली होती की नक्षलवाद्यांचा टॉप कमांडर मिलिंद तेलतुंबडे हा मोठ्या प्रमाणावर नक्षलींची भरती करण्याच्या तयारीत आहे. त्या माहितीच्या आधारे सी- 60 जवानांनी काल मिलिंद तेलतुंबडे आणि 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. गडचिरोली पोलिसांना मिळालेलं हे यश मोठं असून त्यामुळे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगडमधीलच नव्हे तर देशातील नक्षलवादी चळवळीला धक्का मोठा धक्का बसला आहे असं नागपूरचे डीआजी संदीप पाटील म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते. 


पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले की, ठआम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नक्षलवादी आहेत. त्यानंतर सोमय मुंडे यांच्या नेतृत्वात सी - 60 च्या दलाने अभियान राबविले. सकाळी सहाच्या सुमारास नक्षलींनी अत्याधुनिक हत्यारांच्या सहाय्याने फायरिंग सुरू केले. त्यामध्ये ग्रेनेडचा ही वापर केला. त्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. 26 नक्षलवाद्यांची जी प्रेतं मिळाली त्यात मिलिंद तेलतुंबडे याचा समावेश आहे. एकूण 16 नक्षलींची ओळख पटली आहे, 10 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही.ठ


काल झालेल्या पोलीस-नक्षलवादी चकमकीत सी- 60 चे सुमारे 300 जवान सहभागी झाले होते. कालच्या घटनेत मारले गेलेले बहुतांशी नक्षली गडचिरोली सह छत्तीसगड परिसरातील होते. मात्र, ते गडचिरोली मध्ये कार्यरत असलेल्या दलम चे आहेत.


जरी 26 नक्षली मारले गेले असले तरी इतर काही नक्षली जखमी झाले असावे अशी शक्यता आहे. आम्ही त्यासाठी आमचे network active केले आहे असं पोलीस अधिक्षकांनी माहिती दिली. मृत नक्षलीची प्रेतं त्यांच्या नातलगांना पूर्ण पंचनामा, पोस्टमार्टम आणि कायदेशीर करून सोपविले जाईल असं पोलीस अधिक्षक अंकित गोयल म्हणाले. 


मिलिंद तेलतुंबडेसह 26 नक्षलवादी ठार
काल झालेल्या पोलीस नक्षलवादी चकमकीत देशातला सर्वात टॉपचा नक्षल कमांडर आणि 50 लाखांचं बक्षिस असलेला मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. पोलिसांकडून याबाबत पुष्टी करण्यात आली आहे. काल झालेल्या नक्षल चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तब्बल 26 नक्षल्यांना कंठस्नान घातल्यानंतर त्या भागात सर्चिंग ऑपरेशन दरम्यान 29 अत्याधुनिक शत्रसाठा आणि मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य, 26 नक्षल्यांचे शव रात्री उशिरा कोटकल पोलीस मदत केंद्रात पोहोचविण्यात आले. दरम्यान मारल्या गेलेल्या नक्षल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काल चकमकीनंतर शोध अभियानात रात्र झाल्याने घटनास्थळी शोधमोहीम थांबविण्यात आली होती. मात्र आज सकाळपासून परत एकदा या भागात शोध मोहीम राबवली जात आहे.


दरम्यान, या चकमकीत मिलिंद तेलतुंबडेचा खात्मा करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावाचा रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले  प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. त्याच्यावर देखील या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याशिवाय जांभुळखेडा स्फोटात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. मिलिंद हा दीपक आणि सह्याद्री अशा विविध नावानी चळवळीत वावरतो. सोबतच दंडकारण्य केंद्रीय समितीचा तो सदस्य असून त्याच्यावर एक कोटीच्यावर बक्षीस आहे.


कोण आहे मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री? 



  • 50 ला रुपयांचा इनाम असलेला नक्षलवाद्यांचा सर्वात मोठा नेता. 

  • मावोवादी सर्वोच्च सेंट्रल कमिटीचा सदस्य.

  • एलगर परिषदेतील फरार आरोपी. 

  • एल्गारमधील कारावासात असलेला दुसरा आरोपी डॉक्टर आनंद तेलतुंबडेचा भाऊ.

  • पश्चिम भारताचे काम ज्यात महाराष्ट्र मुख्य ह्याचा प्रभारी. 

  • जंगल आणि अर्बन ह्या क्षेत्रातील दोन्हीवर कामाचा अधिकार.

  • एमएमसी म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेश तिन्ही राज्यांचा एमएमसी असा गुरीला झोन याने विकसित केला आहे.

  • अॅंजेला सोनटक्के ही त्याची पत्नी. ही सुद्धा मावोवादी म्हणून पकडली गेली होती. 

  • मिलिंद हा वणी - राजुरा परिसरात लहानाचा मोठा झालेला.

  • शहरी भागात मावोवादी संघटनांमध्ये दलित समाजातील तरुणांना भरती करण्याचे विशेष लक्ष.

  • शस्त्र ट्रेनिंग देणे, ऑपरेशनला मान्यता देणे हे सुद्धा कामाचा भाग. त्यामुळे ज्या शेकडो हत्या गेलं दशकभर पोलीस व सामान्य नागरिकांच्या माओवाद्यांच्या हाती झाल्या त्याला जवाबदार.


महत्त्वाच्या बातम्या :