एक्स्प्लोर
नागपुरातील शिवसेनेच्या प्रचारवाहनाच्या चालकाकडे परवानाच नाही
नागपूर : नागपूरच्या वनदेवीनगरमध्ये झालेल्या अपघातातील कारचालक गौरव बोरकरकडे वाहनचालक परवानाच नसल्याचं समोर आलं आहे. शनिवारी रात्री शिवसेनेचं प्रचार वाहन थेट झोपडीत शिरल्यानं एक महिला आणि चिमुरडीचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणातला आरोपी कारचालक गौरव बोरकर याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सच नाही. त्यामुळे त्याच्या हाती कार सोपवलीच कशी, असा सवाल उपस्थित होत आहे. 19 वर्षीय गौरव बोरकर सध्या अटकेत असून शिवसेना नेते बंडू तळवेकर यांचा तो कार्यकर्ता आहे.
शिवसेनेच्या उमेदवार सुरेखा तळवेकर यांच्या प्रचारावेळी मारुती 800 कार ताज मोहम्मद यांच्या झोपडीत शिरल्यानं ताज यांची वृद्ध आई इस्लाम बी आणि सहा महिन्यांची मुलगी आसिया यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर पाच जण जखमी झाले. घटनेच्या वेळी कार्यकर्ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
नागपुरात सेना उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीने 7 जणांना चिरडले!
नागपुरातील प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनेच्या सुरेखा बंडू तळवेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्या शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक आणि पक्षाचे नागपुरातील महत्वाचे नेते बंडू तळवेकर यांच्या पत्नी आहेत. एका वळणावर प्रचारात वापरली जाणारी मारुती 800 कार अनियंत्रित झाली आणि थेट शेजारच्या झोपडीत शिरली. झोपडीत बसलेलं कुटुंब त्या कारखाली चिरडलं गेलं.सदाभाऊ खोतांच्या मुलाच्या प्रचारगाडीला अपघात, दोन्ही सुनांसह 9 जखमी
घटनेनंतर लोकांनी कारमधील शिवसेना कार्यकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते पळून गेले. मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी जमले आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या कारची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement