एक्स्प्लोर

Ganesh Naik : गणेश नाईक यांना सत्र न्यायलयाचा धक्का; दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळला

Ganesh Naik : भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली असून ठाणे सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Ganesh Naik : भाजप नेते आमदार गणेश नाईक यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे. ठाणे सत्र न्यायलयाने गणेश नाईक यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात बेलापूर आणि नेरूळ येथील पोलीस ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी गणेश नाईक यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. 

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच धमकविल्या प्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी भाजप आमदार गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. याप्रकरणी बुधवारी न्यायमूर्ती एन.के. ब्रम्हे यांच्यासमोर सुनावणी होणार होती. मात्र या प्रकरणात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज सत्र न्यायलयाने निकाल सुनावला. 

गणेश नाईक यांच्याविरोधात दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यातील तपास अधिकाऱ्यांनी गणेश नाईक यांच्या कोठडीची मागणी केली होती. नेरूळ पोलिसांनी बलात्कार प्रकरणामध्ये नाईक यांची मेडिकल करणे गरजेचे आहे, यासाठी कोठडी पाहिजे अशी मागणी केली. तर बेलापूर पोलीस तपास अधिकाऱ्यांनी धमकावण्यात आलेल्या गुन्ह्यात शस्त्र जप्त करायचे आहे, म्हणून त्यांची कोठडी पाहिजे असे सांगितले. त्यामुळे जामीन देवू नका अशी विनंती कोर्टाला करण्यात आली. तर नाईक यांच्या वकिलांनी सर्व संमतीने झाले आहे, त्यामुळे याला बलात्कार मानू नये असा युक्तिवाद केला होता.

फिर्यादीवर बलात्कार होत होता, मनाविरुद्ध सबंध ठेवला जात होता असा धक्कादायक खुलासा महिलेच्या वकिलांनी केला. तसेच सध्या दोन वेळा नातेवाईकांमार्फ़त फिर्यादी यांना गुन्हा मागे घेण्यासाठी धमकी देण्यात आलीय, त्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल आहे, असे पीडित महिलेच्या वकीलांनी सांगितले. 

काय आहे प्रकरण?

भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दीपा चौहान यांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत बोलताना दीपा चौहान म्हणाल्या की, गणेश नाईक यांच्यासोबत गेल्या 27 वर्षापासून आपण लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहत असून त्यांच्यासोबतच्या संबंधातून 15 वर्षाचा मुलगा झाला आहे. गणेश नाईक यांनी आपल्या मुलाला वडिलांचे नाव द्यावे आणि त्याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार

Embed widget