एक्स्प्लोर

वसईतील चिंचोटी धबधब्यावर अडकलेले 20 जण सुखरुप, एकाचा मृत्यू

धोकादायक ठिकाणी असलेल्या यापैकी पाच जणांना हेलीकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. तर पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर काही जण बाहेर पडले.

पालघर : पावसाचा जोर वाढल्यामुळे वसईतील चिंचोटी धबधब्यावर पोहायला गेलेले पर्यटक वरतीच अडकले. यातील सर्व 20 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र दुर्दैवाने एक जणाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. धोकादायक ठिकाणी असलेल्या यापैकी पाच जणांना हेलीकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. तर पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर काही जण बाहेर पडले. चिंचोटी धबधब्यावर पायी जाण्यासाठी दोन तास लागतात. त्यामुळे वसईच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टरची मागणी केली. या सर्वांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली. ठाणे जिल्ह्यात मुसळधार, मध्य रेल्वेवर परिणाम कोकणासह ठाणे पालघर जिल्ह्यात कोसळणाऱ्या तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील वाशिंद येथील बोगदा पाण्याखाली गेल्याने तब्बल 42 गावांचा संपर्क तुटला आहे. वाशिंद पूर्व आणि वाशिंद पश्चिम यांना जोडणारा 42 गावातील गावकऱ्यांना शहराशी जोडणारा एकमेव पर्याय आहे. गावकऱ्यांना या रेल्वेच्या बोगद्यातून शहराच्या ठिकाणी ये जा करावी लागत आहे. रेल्वेच्या बोगद्यातील पावसाचे पाणी ओसरण्यासाठी किमान 4 ते 5 तास लागणार असल्याचं बोललं जात आहे. पालघर जिल्ह्यात नद्यांना पूर, जनजीवन विस्कळीत पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जव्हार-विक्रमगड रोडवरील साखरे पुलावर पाणी आलं आहे. त्यामुळे नाशिक आणि जव्हारवरुन विक्रमगड आणि पालघरकडे जाणारी वाहतूक बंद आहे. वसईतील चिंचोटी धबधब्यावर अडकलेले 20 जण सुखरुप, एकाचा मृत्यू देहर्जे नदीला मोठा पूर आल्यामुळे कुर्झे येथील पुलावर पाणी आलं आहे. या पुलावरुन विद्यार्थी धोकादायक प्रवास करत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे रस्ते बंद होण्याची वेळ आली असून अजूनही पावसाचा जोर कायम आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वसईतील चिंचोटी धबधब्यावर अडकलेले 20 जण सुखरुप, एकाचा मृत्यू कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातील नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आंबेरी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कोकणात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. नागपुरात तब्बल 24 वर्षांनी एवढा पाऊस अधिवेशनाचा कालचा दिवस पाण्यात घातल्यानंतर नागपूरसह विदर्भावर पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचं सावट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  खबरदारी म्हणून आज नागपुरातल्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागपुरात रात्री पावसाने विश्रांती घेतली असली तरी सकाळपासून थांबून-थांबून हलका पाऊस होतोय. दरम्यान, सकाळपासून सुरु झालेल्या पावसामुळे रामटेक भागातल्या पिडंकेपार गावात वीज कोसळली. यात दोन जणांचा मृत्यू झाला. हर्षल चनेकार आणि नागेश्वर मोहुले अशी मृतांची नावं आहेत. याआधी तब्बल 24 वर्षांपूर्वी म्हणजे 1994 साली नागपुरात इतका मोठा पाऊस झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget