एक्स्प्लोर
ठाण्यात अवैध रेती उपशावर कारवाई, 9 कोटींचा मुद्देमाल जप्त

ठाणे : ठाण्यामध्ये आज अवैध रेती उपश्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यामध्ये अवैध रेती आणि ती काढण्यासाठी लागणारी विविध सामुग्री मिळून सुमारे 9 कोटी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ठाणे, भिवंडी आणि कल्याण अशा तीन तालुक्यात एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या दरम्यान 9 कोटीच्या मालाच्या व्यतिरिक्त 6 लाख 60 हजार रुपयांचा दंडही संबंधितांकडून वसूल करण्यात आला आहे. कळवा तालुक्यात रेतीबंदर, नागला बंदर आणि दिवा इथे ही कारवाई करण्यात आली. यात 270 ब्रास रेती, 1 पंप आणि एक बार्ज जप्त करण्यात आला. रेतीबंदर आणि खारबाव मिळून 963 ब्रास रेती तर कल्याण येथे 4000 (चार हजार) ब्रास इतक्या मोठ्या प्रमाणात रेती जप्त करण्यात आली. यावर्षी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत एकूण 19 कोटी रुपयांची रेती आणि अवैधपणे रेती काढण्याची सामुग्री जप्त करण्यात प्रशासनाला यश आलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल























