एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : 'मुख्यमंत्री बघेल जर भाजपमध्ये गेले तर ते 'हर हर महादेव' अॅप होईल', उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : महादेव अॅप प्रकरणातील आरोपी शुभम सोनी याने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर 508 कोटी रुपये दिल्याचा आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महादेव बेटिंग अॅपवरुन (Mahadev Betting App) भापवर टीकास्र सोडलं. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे भाजपमध्ये सहभागी झाले तर महादेव बेटिंग अॅप हे हर हर महादेव अॅप होईल'. सध्या महादेव बेटिंग अॅप प्रकरणात अनेक मोठे खुलासे ईडीकडून करण्यात येत आहेत. त्यातच यामधील आरोपी शुभम सोनी याने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर 508 कोटी रुपये दिल्याचा आरोप केलाय. पण मुख्यमंत्री बघेल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावेल आहेत. त्यातच आता याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी देखील भाजपवर निशाणा साधलाय.

 छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुकींची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. त्यातच उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलंच तापलंय. मुख्यमंत्री बघेल यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर त्यांनी देखील यावर भाष्य करत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. 

उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं ? 

'तसं बघायला गेलं तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे भाजपमध्ये कधीही सामील होणार नाहीत, पण जरी ते सामील झाले तर महादेव बेटिंग अॅप हर हर महादेव अॅप बनेल आणि त्यांच्यावरील सर्व खटले मागे घेतले जातील', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. 

भूपेश बघेल यांनी काय म्हटलं? 

ईडीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार शुभम सोनी हा पहिल्या दिवशी महादेव बेटिंग अॅपमधील एक अधिकारी होता. दुसऱ्या दिवशी तो त्या अॅपचा मालक झाला. हा माणूस त्याच्या नोकराच्या लग्नात 200 कोटी रुपयांचा खर्च करतो. त्याच्या व्हिडिओमध्येही शंका उपस्थित होतील अशा काही घटना आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. 

केंद्र सरकराचं मोठं पाऊल 

अंमलबजावणी संचालनालयाच्या अर्थातच ईडीच्या  विनंतीवरून केंद्र सरकारने महादेव बेटिंग अॅपवर  बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने  महादेव बुक अॅपसह 22 बेकायदेशीर बेटिंग अॅप्स आणि वेबसाइट्सच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर हे सगळे अॅप्लिकेशन्स बंद करण्यात आले आहेत.  बेकायदेशीर बेटिंग अॅप सिंडिकेटविरोधात ईडीने केलेल्या तपासानंतर आणि छत्तीसगडमधील महादेव बुकवर टाकलेल्या छाप्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये अॅपचे बेकायदेशीर कामकाजही उघड करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Mahadev App Banned: केंद्र सरकारचं मोठं पाऊल, महादेव बुक अॅपसह 22 बेटिंग अॅप्लिकेशन्सवर बंदी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 14 May 2024Vare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 14 May 2024Jayant Patil Majha Vision Full : जळजळीत प्रश्नांवर खणखणीत उत्तरं; जयंत पाटील Majha Vision ExclusiveTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 07 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
Embed widget