एक्स्प्लोर

लोडशेडिंग सुरु, तोडफोड झाल्यास प्रशासन जबाबदार, आव्हाड आक्रमक

चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा असल्याने, तात्पुरत्या स्वरूपाचं भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

मुंबई: ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यात भारनियमनाचं संकट आहे. चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा असल्याने, तात्पुरत्या स्वरुपाचं भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. सध्या राज्यात  400 ते 500 मेगावॅट वीजेचा तुटवडा आहे.  सेंट्रल ग्रीडमध्ये वीज महाग झाली आहे. इतर राज्यांनी अधिकच्या किंमतीने वीज विकत घेतली आहे,त्यामुळे वीज उपलब्ध नाही. परिणामी लोडशेडिंग सुरु झालं आहे.  ठाण्याजवळ मुंब्रा, दिवा भागात चार तास लोडशेडिंग आहे. G1, G2 आणि G3 या तीन गटात 3 ते 4 तासांचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे. औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परळी, मुंब्रा, भिवंडी, नाशिक या परिसरात लोडशेडिंग होत आहे.  ऑक्टोबर हिट, कृषी पंप उपसा आणि सणासुदीमुळे विजेच्या मागणीत वाढ आहे. त्यामुळे त्याप्रमाणात वीजनिर्मिती होत नसल्याने आता भारनियमन लागू झालं आहे. काय आहेत भारनियमनाची कारणं? - कोळशाच्या तुटवड्यामुळे औष्णिक वीज निर्मिती केंद्रात वीज निर्मिताला फटका - कोयना जलविद्युत केंद्रात पुरेसा पाणीसाठा असला तरी, पाणीसाठा राखीव ठेवावा लागत असल्याने, अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यावर मर्यादा - खुल्या बाजारात वीज महाग असल्याने आणि पुरेशी उपलब्धता नसल्याने विकत घेण्यात अडचणी - शेजारच्या राज्यात निवडणुका तोंडावर असल्याने जास्त वीज त्या राज्यांमध्ये खर्च होत असल्याची सूत्रांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक लोडशेडिंगवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायदा हातात घेण्याची भाषा केली आहे. मुंब्र्यात आठ ते नऊ तास लोडशेडिंगनंतरही वीज नसल्याने, जाळपोळ आणि तोडफोड झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाडांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. “वीज नसल्याने कार्यकारी अभियंत्यांना फोन केला, पण त्यांच्याकडून प्रतिसाद नाही. मुख्य अभियंत्यांनीही काहीच उपाय केले नाहीत. कुणाचा प्रतिसाद नाही, सतत लोडशेडिंग, अधिकारी फोन उचलत नाही, आमदारांच्या फोनला प्रतिसाद देत नाही” असा आरोप करत चिडलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी धमकी दिली. तोंडाला काळ फासू असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. राज्यात पहिली जाळपोळ झाली तर ती माझ्याकडून, माझ्या मतदारसंघातून होईल. लोक स्थानिक आमदाराला म्हणजेच मला शिव्या देत आहेत, असं आव्हाड म्हणाले. सुप्रिया सुळे यांचं ट्विट औरंगाबादमध्ये सकाळी साडेसहापासून वीज नव्हती. मराठवाड्यातील सर्वात मोठे शहर असणाऱ्या औरंगाबादची ही अवस्था; खेड्यापाड्यात तर असे अघोषित भारनियमन सुरूच आहे. @CMOMaharashtra तुम्ही महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार होता म्हणे. तुमच्या त्या घोषणेचे काय झाले?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

माजी नगराध्यक्षाने लेखापालावर उधळल्या 500 रुपयांच्या नोटा; आरेरावी करत धमकावलं, जालन्यात खळबळ!
माजी नगराध्यक्षाने लेखापालावर उधळल्या 500 रुपयांच्या नोटा; आरेरावी करत धमकावलं, जालन्यात खळबळ!
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Embed widget