एक्स्प्लोर
VIDEO : तावडे म्हणतात शिक्षक-प्राध्यापक चोर : अजित पवार
समृध्दी महामार्गाचं नावही आम्हीच ठरवणार तुम्ही बसा भांडत, अशी मिश्कील टिप्पणीही अजित पवारांनी केली आहे. या वक्तव्यावरुन 2019 चे सरकार आपणच स्थापन करणार असल्याचा दावा केल्याचा दिसून आला.
बारामती : 'शिक्षक-प्राध्यापक चोर, तर संस्थाचालक दरोडेखोर असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अनेकदा खासगीत माझ्याकडे बोलून दाखवले आहे', असा गौप्यस्फोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. शिक्षकांच्या रिक्त जागा भरती संदर्भात सध्याचे सरकार उदासीन आहे यावर बोलत असताना अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. अजित पवारांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगणार आहे.
बारामतीमधील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या आर. एन. शिंदे सभागृह बहुउद्देशीय इमारतीचा पायाभरणी समारंभ अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी पार पडलेल्या सभेत अजित पवार बोलत होते.
अजित पवार नेमकं काय बोलले?
“काही शिक्षण संस्थानी शिक्षणाचे बाजारीकरण केलं, तर काही चुकीच्याही वागल्या असतील. चुकीच्या संस्थांवर तुम्ही आक्षेप घ्या, त्यावर आमचं काहीही म्हणणं नाही. पण ज्या संस्थां चांगल्या काम करत असतील तर त्यांच्या अडचणी दूर करा. अनेकदा खासगीत विनोद तावडे यांनी शिक्षक-प्राध्यापक चोर, तर संस्थाचालक दरोडेखोर असल्याचं म्हटलं आहे.”
समृध्दी महामार्गाचं नामकरणावरुन अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
समृध्दी महामार्ग तयार व्हायला अजून चार-पाच वर्ष आहेत. त्यावरुन ते भांडत बसलेत. पुणे-मुंबई एक्स्प्रेस सुरु केला आणि उर्वरीत काम आम्ही पूर्ण केलं आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग असं नाव देऊन टाकलं याची आठवण त्यांनी करुन दिली. "समृध्दी महामार्गाचं नावही आम्हीच ठरवणार तुम्ही बसा भांडत", अशी मिश्कील टिप्पणीही अजित पवारांनी केली आहे. या वक्तव्यावरुन 2019 चे सरकार आपणच स्थापन करणार असल्याचा दावा केल्याचा दिसून आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement