एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लातूर-मुखेड रोडवर भीषण अपघात, मृतांचा आकडा अकरावर
लातूर-मुखेड रस्त्यावर जांब गावाजवळ वऱ्हाडाच्या टेम्पोला टँकरने समोरासमोर धडक दिली, ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण गंभीर जखमी आहेत.
नांदेड/लातूर : आयशर टेम्पो आणि टँकरच्या धडकेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लातूर-मुखेड रस्त्यावर जांब गावाजवळ वऱ्हाडाच्या टेम्पोला टँकरने समोरासमोर धडक दिली, ज्यात 11 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी आहेत.
जखमींना आजूबाजूच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातामध्ये मृत पावलेले सर्व जण मृत सर्व खरोसा (ता. औसा) येथील आहेत. लातूर – मुखेड रस्त्यावर जांब (ता. मुखेड, जि. नांदेड) या ठिकाणी सकाळी साडे नऊ वाजता हा अपघात घडला.
खरोसा येथून नारंगे कुटुंबीयांच्या लग्नासाठी वऱ्हाड मुखेडला जात होतं. शिरुर ताजबंद ते मुखेड रस्तावर जांब गावजवळ टँकर (MH 04 EY 770) आणि आयशर (MH 36 351) यांच्यात समोरासमोर धडक झाली.
या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही जखमी रुग्णांना जळकोट ग्रामीण रुग्णालयात, तर काहींना मुखेड, जिल्हा नांदेड येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. या विचित्र अपघातात आयशरची केबीन चक्काचूर झाली असून अपघात केबिनमधील आठ जणांचा मृत्यू झाला.
अपघातातील मृतांची नावे
भारतबाई शिवराम कुराडे, वय 65, ममदापूर, ता. लातूर
रुक्मिणीबाई गोरोबा राजे, वय 70, निटूर, औसा
शमा सतार तांबोळी, वय 38, खरोसा
कस्तुरबाई फुलबांगडीकर, वय 60, मुरूम
अरुणा शेषेराव नारंगे, वय 45,लातूर
बाळू लिंगप्पा तिगलमपल्ली, वय 70, वाघदरी
महानंदाबाई बोडके, वय 45, खरोसा
स्नेहा सुधीर कुराडे, वय 10, मुलगी, ममदापूर
सुमनबाई बाळू कुंभार, वय 65, वाघदरी
तुकाराम बागले, वय 36, मुरंबी, आयशर चालक
सध्या लग्नसराईचा काळ असल्यामुळे रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी आहे. याचमुळे राज्यभरातून विविध अपघाताच्या घटना समोर येत आहेत. तिकडे जळगाव-धुळे मार्गावरही पहाटे साडे चारच्या सुमारास मारुत कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement