एक्स्प्लोर
Advertisement
नागपुरात तरुणाला शेपटी, वैद्यकीय वर्तुळात खळबळ
नागपूर : शाळेत असताना आपण मानवी उत्क्रांतीचा अभ्यास केला आहे. वानराचा माणूस होताना निसर्गानं अनेक अवयव हिरावून घेतले. मात्र नागपूरमधला एक तरुण या सिद्धांताला अपवाद ठरला आहे. कारण त्याला चक्क शेपटी असल्याचं निष्पन्न झालं आहे. या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाला या शेपटीपासून मुक्तता हवी आहे. जन्मजात शेपटी असलेला हा तरुण गेली 18 वर्षे हा अवयव आपल्या शरीरावर बाळगून आहे. पण जेव्हा तो असह्य झाला तेव्हा ती काढून टाकण्याचा निर्णय घेतला. यामुळे रुग्ण मानसिक तणावाखाली येऊन त्याला डिप्रेशनचा सामना करावा लागू शकतो.
जो अवयव माणसाला नाही, अशा अवयवाला काढून टाकण्याचं आव्हान डॉक्टरांसमोर आहे. काळानुरुप माणसाचे अनावश्यक अवयव गळून पडले, पण इथं उलटं झालं. एखाद्या माणसाला शेपटी असल्याचं उदाहरण जवळपास नाहीच. त्यामुळे या मारुतीरुपी रुग्णाला खचण्याची गरज नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
भारत
Advertisement