एक्स्प्लोर
बिअरचा मग फ्री न दिल्याने नागपुरात बिअर शॉपवर तलवार हल्ला
नागपुरात अमरावती मार्गावरील 'झिरो बिअर शॉपी'त गुंडांनी केलेली तोडफोड सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

नागपूर : बिअर पिण्याचा मग मोफत दिला नाही म्हणून गुंडांनी बिअर शॉपीवर तलावर हल्ला चढवला. नागपुरात अमरावती मार्गावरील 'झिरो बिअर शॉपी'त गुंडांनी केलेली तोडफोड सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे.
बिअर शॉपीत बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास तीन तरुण आले होते. बिअरवर सुरु असलेली स्कीम आणि मोफत
मिळणाऱ्या 'मग' वरुन त्यांचा बिअर शॉपीतील कर्मचाऱ्यांशी वाद झाला.
वादानंतर तिघं जण तिथून निघून गेले आणि थोड्या वेळात पाच ते सहा आरोपी तलवारीसह परत आले. बिअर शॉपीसमोर हल्ला चढवत त्यांनी दगडफेक केली आणि तोडफोड सुरु केली. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमीही झाला.
आरोपींनी तलवारींसह घातलेला हैदोस आणि तोडफोड सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी नागपुरातील अंबाझरी पोलिस तपास करत आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement


















