एक्स्प्लोर

महाजनादेश यात्रेच्या रथासमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अंडी, कडकनाथ कोंबड्या फेकल्या

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचं आमिष 'महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी'ने दिले होते. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांची वळपास 500 कोटींची फसवणूक झाली होती.

सांगली : सांगलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकण्यात आल्या. इस्लामपूरच्या ताकारी-पलूस रोडवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या यात्रेच्या रथापुढे येत कोंबड्या आणि अंडी फेकली. कडकनाथ कोंबडीपालन घोटाळाप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी हातात अंडी आणि कोंबड्या घेतल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचा रथ येताच त्यांनी अंडी फेकली आणि कोंबड्या हवेत भिरकावल्या. मात्र या आंदोलनात अंड्यांचं नुकसान झालंच, पण काही कोंबड्याही रथाखाली चिरडल्या गेल्या. कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचं आमिष 'महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी'ने दिले होते. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांची वळपास 500 कोटींची फसवणूक झाली होती. यानंतर संचालक मंडळवर गुन्हाही दाखल झाला आहे. ही कंपनी सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. तर, खोत यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी व कोंबड्या विका सांगली जिल्ह्यात कडकनाथ कुक्कुटपालनाची शक्कल लढवित गुंतवणुकीची भन्नाट योजना सुरू केली आहे. ‘रक्कम गुंतवा, पक्षी पाळा, अंडी व कोंबड्या विका’ असं या योजनेचे स्वरुप आहे. यात प्रोजेक्ट मालकास एकूण 75 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते. पक्षी घेताना 40 हजार आणि राहिलेले 35 हजार 3 महिन्यांनतर अशा दोन टप्प्यात रक्कम घेतली जाते. या कालावधीत 200 पक्षांच्या युनिटसाठी कंपनीकडून खाद्य, औषधे, लस, भांडी दिली जातात. तीन महिन्यानंतर कंपनी शेतकर्‍याकडे 100 मादी आणि 20 नर ठेवून 80 पक्षी घेऊन जाते. 4 ते 5 महिन्यानंतर पक्ष्यांनी अंडी देणे सुरु केल्यानंतर कंपनी पहिली 2 हजार अंडी प्रतिनग 50, दुसरी दोन हजार अंडी 30 व तिसरी 3500 अंडी 20 रुपये या दराने घेऊन जाते. यातून शेतकर्‍याला एका वर्षात 2 लाख 30 हजार आणि 375 रुपयाप्रमाणे 120 पक्ष्यांच्या विक्रीतून 45 हजार असे पावणे तीन लाख देण्याचे आमिष दाखविले. 75 हजारांच्या बदल्यात वर्षभरात मोठा परतावा मिळत असल्याने तसेच दोन टप्प्पात रक्कम द्यायची असल्याने अनेक शेतकरी या योजनेला सहजासहजी बळी पडले आहेत.

शेतकऱ्यांची फसवणूक

वाळवा तालुक्यातील कापूरवाडी येथील संतोष कदम यांनी 600 कडकनाथ कोंबड्याचे शेड उभारले आहे. 7 लाख 20 हजार रुपये या व्यवसयात गुंतवले, मात्र आता तो अडचणीत आला आहे. दीड महिन्यात 75 हजार खाद्यावर खर्च केले आहेत. हजारो अंडी घरात पडून आहेत. कोंबड्यांना खाद्य देण्यासाठी आता हाती पैसा नसल्याने झाडाची पाने या कडकनाथ कोंबड्यांना घालण्याची वेळ संतोषवर आली आहे. बायकोच्या बचतगटावर कर्ज काढून, दागिने गहाण ठेवून संतोषने हा व्यवसाय वाढवला, मात्र आज हा व्यवसायच अडचणीत आल्याने या संतोषवर संकट ओढवलं आहे. संतोष सारखीच स्थिती अनेकांची आहे. संबंधित बातम्या इतर नेत्यांना ईडीने बोलावलं, राजू शेट्टी मात्र स्वत:च ईडी कार्यालयात पोहोचले 'कडकनाथ’ कुक्कुटपालनात शेतकऱ्यांची फसवणूक, जवळपास 500 कोटी अडकले आरोप सिद्ध करावे अन्यथा भरचौकात विष्टा खावी, राजू शेट्टींवर टीका करताना सदाभाऊ खोतांची जीभ घसरली
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget