एक्स्प्लोर
स्वाभिमान संघटनेने कोकणात जाणाऱ्या गाड्या विनाटोल सोडल्या!
मुंबई : मुंबई-गोवा हायवेची दूरवस्था आणि गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची सुरु झालेली लगबग पाहता स्वाभिमान संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानचे कार्यकर्ते खालापूर टोलनाक्यावर आजपासून उपस्थित राहून कोकणात जाणाऱ्या गाड्यांना विनाटोल सोडत आहेत.
विनाटोलसाठी तुमच्या गाडीवर फक्त कोकणात जात असल्याचं पोस्टर किंवा स्टिकर लावलेलं पाहिजे. 4 सप्टेंबरपर्यंत स्वाभिमानचे कार्यकर्ते टोलनाक्यावर उभे राहणार असल्याचं संघटनेचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी सांगितलं.
सावित्री नदीवरचा पूल कोसळल्यानंतर कोकणच्या रस्त्याचा पंचनामा झाला आणि रस्ता खराब असल्याची ओरड होऊ लागली. त्यामुळे पुणेमार्गे कोकणात जाणाऱ्यांना टोलमधून सूट देण्याची मागणी नितेश राणेंनी केली होती. मात्र ती सरकारने धुडकावून लावली. त्यानंतर स्वाभिमानने थेट रस्त्यावर उतरुन विनाटोल गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे.
नितेश राणे म्हणाले की, राज्य सरकार कोकणी माणसावर अन्याय करत आहे. स्वाभिमानचे कार्यकर्ते 4 सप्टेंबरपर्यंत खालापूर, लोणावळा या टोलनाक्यांपासून कोल्हापूरपर्यंत उभे राहून कोकणात जाणाऱ्या वाहनांना विनाटोल पाठवणार आहेत. यामुळे तरी राज्य सरकारला जाग येईल आणि टोलमुक्तीसाठी पुढाकार घेईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement