एक्स्प्लोर
रायगडमध्ये वस्तीच्या एसटी बसमध्ये सापडलेली बॉम्बसदृश वस्तू निकामी करण्यात यश
रायगडमध्ये वस्तीच्या एसटी बसमध्ये बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे.

रायगड :रायगडमध्ये वस्तीच्या एसटी बसमध्ये सापडलेली बॉम्बसदृश वस्तू निकामी करण्यात अखेर यश मिळालं आहे. पेणहून आपटा गावी जाणाऱ्या वस्तीच्या गाडीत ही वस्तू सापडली होती.
पेण आगाराची बस आपटा गावी वस्तीसाठी जाते. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे ही बस पेणहून आपटा गावी जाण्यासाठी निघाली. आपडा गावात पोहोचल्यानंतर रात्री 11 च्या सुमारास गाडीत बॉम्बसदृश वस्तू असल्याचं चालक-वाहकाच्या लक्षात आलं. तातडीने त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर अलिबाग येथून बॉम्ब स्कॉड आपटा येथे रवाना झालं आणि त्यांनी आज सकाळी ही बॉम्बसदृश वस्तू निकामी केली आहे.
रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्करांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली आहे. दरम्यान रात्रभर ही एसटी बस पोलीस संरक्षणात ठेवण्यात आली होती. तसंच आपटा गावाला छावणीचे स्वरूप आलं होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
मुंबई
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
