Mumbai Municipal Corporation : मुंबई महानगर पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागात काम करणारे कनिष्ठ अवेक्षक विष्णू घुमरे यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. घन कचरा व्यवस्थापनच्या उप आयुक्तांच्या आदेशानुसार घुमरे यांच्यावर ही कारवाई झाली आहे. 


पालिकेत काम करत असताना कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता घुमरे यांनी मुंबई जिल्हा बँकेची निवडणूक लढवली आणि सध्या सदस्य म्हणून देखील कार्यरत असल्याचं समोर आलं आहे. घुमरे हे चिंतामणी औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेच्या सभासद पदावर देखील कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. 


"औद्योगित उत्पादन सहकारी संस्था मतदार संघातून मुंबई बँकेवर संचालक म्हणून निवडून आलेले विष्णू घुमरे हे महापालिकेचे कर्मचारी असल्यामुळे त्यांना निलंबीत करण्याचा आदेश पारीत करण्यात आला आहे. महापालिकेचा कर्मचारी असल्यामुळे औद्योगित उत्पादक सहकारी संस्थेच्या माध्यमातून ते व्यसाय करू शतक नाहीत. परंतु, त्यांना सावकारी सारखा व्यसाय केल्यामुळे त्यांनी महापालिकेच्या अटी आणि सेवाशर्थींचा भंग केला. त्यामुळे त्यांच्या निलंबाचा आदेश महापालिकेकडून देण्यात आला, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. 


उमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप  
दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याव देखील गंभीर आरोप केलाय. घुमरे यांच्यावर झालेली ही कारवाई थांबवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दबाव आणला होता,असा आरोप देखील दरेकर यांनी केलाय. याबरोबरच सहाकर खातं आता घुमरे यांच्यावर कारवाई करेल आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होईल, असे दरेकर यांनी सांगितले आहे. 


महत्वाच्या बातम्या


Ulhasnagar : नागरिकांचा पालिकेत कामासाठी हेलपाटा अन् मनपा अधिकारी, कर्मचारी जंगी पार्टीत व्यस्त... 


Strike : मुंबईतील पाणी टँकर असोसिएशन बेमुदत संपावर, 1500 टँकरचा संपात सहभाग


ठाकरे विरुद्ध ठाकरे सभा होणार, उद्धव ठाकरे काय बोलणार? शिवसेनेची पुढील भूमिका ठरणार?


Sambhajiraje Chhatrapati : 'स्वराज्य' संघटना अन् राज्यसभेची अपक्ष निवडणूक, संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्वाचे मुद्दे