एक्स्प्लोर
कानफुक्यांनी निलंबनाची कारवाई केली : सुरेश धस
मुंबई : निलंबनाची कारवाई ही आमच्यातल्या काही कानफुक्या लोकांनी आहे. धनंजय मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मिळून ही करवाई केली आहे, दोघेही मागच्या दरवाजाने आलेले आहेत, असा घणाघाती पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुरेश धस यांनी केला आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुरेश धस यांच्या गटाने भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यात आली नाही. त्यानंतर राष्ट्रवादीने सुरेश धस यांच्यावर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे.
''मी कुठल्याही पक्षात आता जाण्याचा निर्णय घेतलेला नाही.
यानंतर कार्यकर्त्यांशी बोलणार आहे.
राष्ट्रवादी म्हणजे 164 घराची असं म्हणतात ते खरं आहे,
प्रदेशाध्यक्षांच्या स्वतःच्या घरात 3 आमदार आणि 1 झेडपी अध्यक्ष आहे.
मुंबईत स्टेजवर बंदूका नाचवल्या, कोल्हापुरात भाजपच्या लोकांना स्वतः गाडीतून घेऊन गेले,
उदयनराजे रोज पक्षाविरोधात बोलतात यांच्यावर करवाई नाही?
आणि माझ्यावर कारवाई,
हा अन्याय आहे'', अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी निलंबनानंतर दिली आहे.
सुरेश धस गटाची पंकजा मुंडेंना मदत बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या 5 सदस्यांनी मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ असतानाही भाजपचा अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला. शिवाय भाजपला शिवसंग्राम आणि शिवसेनेना आणि काँग्रेसच्या एका सदस्यानेही मदत केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या सविता गोल्हार यांची तर, जयश्री राजेंद्र मस्के (शिवसंग्राम) यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मंगल प्रकाश सोळंके यांना 25 मतं मिळाली, तर उपाध्यक्षपदाच्या उमेदवार शिवकन्या शिवाजी सिरसाट यांचाही पराभव झाला. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या वादाचा भाजपला फायदा झाला. धनंजय मुंडेंवर नाराजी असलेल्या धस यांच्या गटाच्या 5 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे पंकजा मुंडेंना सत्ता खेचून आणण्यात यश मिळालं. काय आहे वाद? बीड जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांनाच पक्षाकडून बळ दिलं जात असल्याचा धस यांचा आरोप आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्यात धस यांचाही मोठा वाटा आहे. धनंजय मुंडे यांचं नेतृत्व सुरेश धस यांना मान्य नसल्याचं बोललं जात. त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे. संबंधित बातम्या :सुरेश धस यांचं राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
स्वतःच्या रक्ताचे झाले नाहीत, त्यांनी विश्वासघातकी म्हणू नये : धस
गद्दार सुरेश धस यांना धडा शिकवू : अजित पवार
सुरेश धस यांच्या स्वभावातच विश्वासघातकीपणा, धनंजय मुंडेंची टीका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement