एक्स्प्लोर
गिरीश बापट वास्तवाची जाण असणारा नेता: सुप्रिया सुळे
वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या, असं वक्तव्य गिरीश बापट यांनी पुण्यात केलं होतं.
पुणे: पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना वास्तवाची जाणीव आहे. त्यांच्या या वक्तव्याचं मी स्वागत करते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला. त्या इंदापुरात बोलत होत्या.
वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या, असं वक्तव्य गिरीश बापट यांनी पुण्यात केलं होतं.
यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गिरीश बापटांच्या वक्तव्याचं मी मनापासून स्वागत करते. वास्तवाची जाणीव भाजपमध्ये कोणत्या नेत्यामध्ये असेल, तर ती माननीय, आदरणीय बापटसाहेबांकडे आहे. त्यामुळे त्यांनी वास्तव लक्षात घेऊन ते बोललेले आहेत. त्यामुळे त्यांचं मी मनापासून स्वागत करते”.
गिरीश बापट काय म्हणाले होते?
वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या.पुढं काय होईल काय नाही याची चर्चा मी इथे करत नाही. पण पुढे काय होणार आहे हे मला माहिती आहे. कोणाचंही सरकार असो. शेतकऱ्यांना मदत करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे जे काही मागायचं असेल, ते आत्ताच मागून घ्या, असं गिरीश बापट म्हणाले होते.
अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाचे राष्ट्रीय अधिवेशन आणि राष्ट्रीय डाळिंब परिषद पुण्यात संपन्न झाली. त्यावेळी बापट बोलत होते.
डाळिंब उत्पादकांनी काही मागण्या गिरीश बापटांकडे केल्या होत्या. त्यावर बोलण्याच्या ओघात बापटांनी पुढील सरकार बद्दल हे वक्तव्य केलं.
संबंधित बातमी
वर्षभरानंतर सरकार बदलणार, गिरीश बापटांचं खळबळजनक वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement