एक्स्प्लोर

NCP : शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का; अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं

शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. 

Ajit Pawar group got party and symbol : शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून उद्यापर्यंत (7 फेब्रुवारी) शरद पवार गटाला चिन्हाबाबत कळवण्यास सांगण्यात आलं आहे. 

निवडणूक आयोगाने काय म्हटलं आहे?

  • अजित पवाराकंडील पक्ष खरा पक्ष आहे.  
  • पक्ष आणि चिन्ह अजित पवार वापरतील 
  • दोन खासदार अजित पवार गटाच्या बाजूने 
  • 5 आमदारांनी दोन्ही बाजूंनी पत्र दिलं 
  • उद्या 7 फेब्रुवारीपर्यंत  पक्षाचं नाव आणि चिन्ह सूचवावं 
  • पक्षांतर्गत निवडणूक झाल्या नाहीत 

 

अजित पवारांसोबत कोण?

- महाराष्ट्रातील 41आमदार 
- नागालँडमधील 7आमदार 
- झारखंड 1आमदार 
- लोकसभा खासदार 2
- महाराष्ट्र विधानपरिषद 5
- राज्यसभा 1

शरद पवारांसोबत कोण?

महाराष्ट्रातील आमदार 15
केरळमधील आमदार 1 
लोकसभा खासदार 4 
महाराष्ट्र विधानपरिषद 4
राज्यसभा -3

पाच आमदारांनी व एका खासदाराने दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे

ही लोकशाहीची हत्या; अनिल देशमुखांचा आरोप 

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे. 

एका बाजूला निकाल दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाची बैठक

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक निकालानंतर देवगिरीवर आज अजित पवार गटाची महत्वाची बैठक होत आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री,नेते आणि आमदार उपस्थित राहणार आहेत.  बैठकीत निकाल आणि पुढील रणनीती, राज्यसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीसह छगन भुजबळ यांच्या नाराजीवर देखील चर्चा होणार आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळात देवगिरी बंगल्यावर बैठक सुरू होणार आहे. 

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट

दरम्यान, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता आहे. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निकालात अजित पवार गट व शरद पवार गटाचे भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना निकालाहून वेगळा निर्णय लागण्याची शक्यता आहे. 

निर्णयाचे स्वागत करतो, बावनकुळेंची प्रतिक्रिया 

दुसरीकडे, या निर्णयाचे स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. 

शरद पवार गटासमोर मोठं आव्हान 

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने कायदेशीर लढाईसाठी फार कमी वेळ आहे. इतकेच नव्हे, तर कायदेशीर लढाई लढायची झाल्यास पक्ष आणि चिन्ह सुद्धा मिळणार नसल्याने मोठी रणनीती आखावी लागणार आहे. जे नाव आणि चिन्ह दिलं जाईल ते अत्यंत कमी कालावधीत लोकांपर्यंत पोहोचावावं लागणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Embed widget